मरकजहून परतलेल्या नागरिकांनी प्रशासनास माहिती देणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 01:08 PM2020-04-07T13:08:49+5:302020-04-07T13:09:31+5:30

दिल्लीतील मरकजहून परत आलेल्या नागरिकांनी प्रशासनास स्वत:हून माहिती देणे बंधनकारक आहे. जे नागरिक स्वत:हून संपर्क करणार नाहीत अशांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी निर्देश दिले.

Returning citizens from Markaz are obliged to inform the administration | मरकजहून परतलेल्या नागरिकांनी प्रशासनास माहिती देणे बंधनकारक

मरकजहून परतलेल्या नागरिकांनी प्रशासनास माहिती देणे बंधनकारक

Next
ठळक मुद्देमाहिती न दिल्यास गुन्हे दाखल करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिल्लीतील मरकजहून परत आलेल्या नागरिकांनी प्रशासनास स्वत:हून माहिती देणे बंधनकारक आहे. अद्याप माहिती न दिलेल्या नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्षास संपर्क करावा. जे नागरिक स्वत:हून संपर्क करणार नाहीत अशांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी निर्देश दिले.
दिल्लीतील निजामुद्दीन येथे आयोजित मरकज संमेलनास उपस्थित राहिलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. यासाठी संपूर्ण विभागात विलगीकरण केंद्रामार्फत तपासणी करण्यात येत आहे. केंद्र शासनाने पाठविलेल्या यादीनुसार मरकजला उपस्थित राहिलेल्या विभागातील नागरिकांचा शोध घेऊन विलगीकरणात आरोग्य तपासणी सुरू आहे. परंतु अशा नागरिकांनी स्वत:हून जिल्हा नियंत्रण कक्षास माहिती देणे बंधनकारक आहे. ज्यांनी अद्यापपर्यंत माहिती दिली नाही असे प्रशासनाच्या लक्षात आल्यास त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड संविधान कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही डॉ. संजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

मरकजहून नागपूर येथे परतलेल्या नागरिकांसाठी आमदार निवास, वनामती व रविभवन येथे सुरू करण्यात आलेल्या विलगी केंद्रात सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे अशा नागरिकांनी स्वत:हून जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षात माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
जिल्हानिहाय कोरोना नियंत्रण कक्ष

कार्यालयाचे नाव दूरध्वनी क्रमांक
जिल्हाधिकारी, नागपूर ०७१२-२५६२६६८

नागपूर महानगरपालिका ०७१२- २५६७०२१
जिल्हाधिकारी, वर्धा ०७१५२-२४३४४६

जिल्हाधिकारी, भंडारा ०७१८४-२५१२२२
जिल्हाधिकारी, चंद्रपूर ०७१७२-२७२४८०

जिल्हाधिकारी, गडचिरोली ०७१३२-२२२०३१
जिल्हाधिकारी, गोंदिया ०७१८२-२३०१९६

 

 

Web Title: Returning citizens from Markaz are obliged to inform the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.