शासकीय कामे आटोपूनच स्नेहमिलन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:08 AM2021-02-07T04:08:43+5:302021-02-07T04:08:43+5:30
नागपूर : कार्यालयीन वेळेत रामटेक येथे कार्यक्रमाला गेलेल्या मौदा तालुक्यातील २५ ग्रामसेवक आणि पंचायत समितीच्या ४ अधिकाऱ्यांना खंडविकास अधिकारी ...
नागपूर : कार्यालयीन वेळेत रामटेक येथे कार्यक्रमाला गेलेल्या मौदा तालुक्यातील २५ ग्रामसेवक आणि पंचायत समितीच्या ४ अधिकाऱ्यांना खंडविकास अधिकारी दयाराम राठोड यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे; मात्र या कार्यक्रमात तालुक्यातील ग्रामसेवक दैनंदिन कामकाज आटोपून सहभागी झाले होते. सदर कार्यक्रमामुळे कोणत्याही शासकीय कामात अडथळा निर्माण झाला नसल्याचे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या मौदा शाखेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी नागरगोजे यांनी यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यात रामटेक येथे ४ फेब्रुवारी रोजी मौदा तालुक्यात नव्याने रुजू झालेल्या ग्रामसेवकांचे स्वागत आणि स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम सायंकाळी ६.४० वाजता आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात ग्रामसेवक त्यांचे दैनंदिन कामकाज आटोपून सहभागी झाले होते, असे सांगण्यात आले आहे. ही संघटनेची भूमिका असली तरी ग्रामसेवकांनी मुख्यालय सोडण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतली होती का? त्यांनी किती वाजता मुख्यालय सोडले हे चौकशीअंतीच स्पष्ट होईल.