पावसाची उघाड, शेतकऱ्यांंना चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:07 AM2021-06-21T04:07:06+5:302021-06-21T04:07:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मागील तीन दिवसापासून विदर्भात तुरळक पाऊस सुरू आहे. यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील तीन दिवसापासून विदर्भात तुरळक पाऊस सुरू आहे. यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मागील २४ तासात नागपूरसह अन्य जिल्ह्यात तुरळक पाऊस झाला. नागपुरात रविवारी तापमानात १.२ अंश सेल्सियसने वाढ होऊन ३४.३ अशी नोंद झाली. शहरात पावसाची नोंद मात्र नाही. अकोलामध्ये ७.४ आणि वर्धामध्ये ०.५ मिली पावसाची नोंद झाली आहे. अन्य जिल्ह्यातही तुरळक पाऊस पडल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. हवामान विभागाने या आठवड्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला होता. मात्र वाऱ्याच्या दिशेमुळे तो बदलला. या आठवड्यात तुरळक पावसाचा अंदाज नव्याने वर्तविण्यात आला आहे. ढग येतात आणि जातात, असा सध्याचा अनुभव आहे.
नागपुरात रविवारी दुपारी काही भागात थोडा वेळ पाऊस आला. ग्रामीण भागात मात्र पावसाची नोंद नाही. शहरात सकाळची आर्द्रता ७८ टक्के तर सायंकाळी ६३ टक्के नोंदविली गेली.
...
विदर्भातील तापमान
जिल्हा : कमाल : किमान
अकोला : ३५.५ : २२.६
अमरावती : ३५.२ : २२.३
बुलडाणा : २९.८ : २३.०
चंद्रपूर : ३५.२ : २३.८
गडचिरोली : ३१.२ : २४.६
गोंदिया : ३४.० : २४.०
नागपूर : ३४.३ : २४.४
वर्धा : ३३.१ : २४.४
वाशिम : ३२.६ : २०.०
यवतमाळ : ३३.५ : अप्राप्त
...