नहनुमाच्या चौकशीत इसिसबाबत खुलासे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 03:43 AM2019-04-22T03:43:41+5:302019-04-22T03:43:51+5:30

एनआयएकडून ३६ तास चौकशी; ‘हरकत उल हर्ब ए इस्लाम’चे कनेक्शन

Revelations about this in the investigation of Nahumu | नहनुमाच्या चौकशीत इसिसबाबत खुलासे

नहनुमाच्या चौकशीत इसिसबाबत खुलासे

Next

- नरेश डोंगरे

नागपूर : इसिसचा हस्तक मोहम्मद अब्दुल्ला बासित याची पत्नी नहनुमा बासित हिची तब्बल ३६ तास चौकशी केल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेला अत्यंत खळबळजनक माहिती मिळाल्याचे सांगितले जाते. विश्वसनीय सूत्रांनुसार, नहनुमाच्या चौकशीतून डिसेंबर २०१८मध्ये उजेडात आलेले इसिसचे नवे मॉड्युल ‘हरकत उल हर्ब ए इस्लाम’चेही कनेक्शन तपास यंत्रणांच्या हाती लागले आहे.

एनआयएने शनिवारी पहाटे वर्धानजीकच्या म्हसाळा परिसरात छापा मारून नहनुमाला तिच्या आईच्या घरून ताब्यात घेतले होते. तेव्हापासून नहनुमाची एनआयए आणि एटीएसकडून तब्बल ३६ तास चौकशी केली. खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार महिन्यांपूर्वीच नहनुमा एनआयएच्या रडारवर आली होती.

२६ डिसेंबर २०१८ला एनआयएने दिल्ली, मेरठसह १६ ठिकाणी छापेमारी करून अनेक संशयितांना ताब्यात घेतले होते. घातपाताच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांकडून आठ पिस्तुलांसह मोठा शस्त्रसाठाही जप्त केला होता. त्यानंतरच्या चौकशीत मूळचा हैदराबादचा रहिवासी असलेला आणि वर्धा येथील नहनुमाचा पती बासित याला सर्वप्रथम २०१५ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये जाण्याच्या तयारीत असताना नागपुरात अटक झाली होती; नंतर वर्षभराने त्याला हैदराबादला एनआयएने पकडले. तो अमेरिकेत राहणाऱ्या मतिन अजिजी नामक दहशतवाद्याच्या संपर्कात असल्याचे उजेडात आले.

मतिनला एफबीआयने मे २०१८ मध्ये अटक केली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून अब्दुल्ला बासितचे देशविरोधी कारनामे उजेडात आले होते. त्याच्या चौकशीतून डिसेंबर २०१८मध्ये इसिसच्या ‘अबुधाबी ब्रिगेड’ आणि पुढे ‘हरकत उल हर्ब ए इस्लाम’ या मॉड्युलचा खुलासा झाला.तेव्हापासून बासितची पत्नी नहनुमा एनआयएच्या रडारवर आली होती. अखेर शनिवारी तिला एनआयएच्या पथकाने वर्धा येथे पकडले. तिच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून अनकोड फाइल्सही मिळाल्याचे समजते. पाकिस्तानसह अनेक विदेशी संपर्काचा या चौकशीतून खुलासा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

दोन वर्षांपूर्वी निकाह
इसिसचा हस्तक असल्याच्या आरोपात सध्या तिहार कारागृहात असलेल्या बासितचा दोन वर्षांपूर्वी उच्चशिक्षित (बीएस्सी बायोटेक) नहनुमासोबत निकाह झाला होता.

Web Title: Revelations about this in the investigation of Nahumu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :ISISइसिस