नागपुरात महसूल खात्याच्या फिरत्या पथकातील अधिकाऱ्यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 12:29 PM2019-12-04T12:29:44+5:302019-12-04T12:31:17+5:30
रात्री होणाऱ्या रेतीच्या अवैध वाहतुकीवर अंकुश लावण्यासाठी पेट्रोलिंगवर असलेल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्याला मारहाण करण्याची घटना मंगळवारी रात्री ११.३० वाजता घडली.
अरुण महाजन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: रात्री होणाऱ्या रेतीच्या अवैध वाहतुकीवर अंकुश लावण्यासाठी पेट्रोलिंगवर असलेल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्याला मारहाण करण्याची घटना मंगळवारी रात्री ११.३० वाजता घडली. आरोपी हा शिवसेनेचे माजी तालुका अध्यक्ष प्रफुल कापसे , त्यांचा भाऊ उत्तम कापसे आणि त्यांचा दिवानजी रोशन महंत आहे. फिर्यादी केळवद मंडळ अधिकारी शरद नांदूरकर आहेत. त्यांच्या तक्रारीवरून खापा पोलीस स्टेशन येथे सरकारी कामात अडथळा निर्माण करून शिवीगाळ व मारहाण केल्याचा गुन्हा तिन्ही आरोपी वर दाखल करण्यात आला आहे. सावनेर ताल्युक्याचे तहसीलदार करंडे यांच्या दिशानिर्देशवरून शरद नांदूरकर केळवद मंडळ अधिकारी आणि पवन बगाडे पटवारी टेम्भुरडोह असे दोघेही रात्री होणारी रेतीची चोरटी वाहतूक यावर आळा घालण्यासाठी यांचे फिरते पथक पेट्रोलिंग गस्त वर खापा पोलीस स्टेशन परिसरात होते. खापा सावनेर मार्गावर के जॉन पब्लिक स्कूल समोर रात्री 11.30 वाजता ट्रक क्रमांक एम एच 40 ए के 99 रेतीने भरलेली वाहन नांदूरकर यांनी थांबवली. ट्रक चालक याच्या कडून रॉयल्टी ची मागणी केली असता विना रॉयल्टी रेतीचे वाहतूक होत असल्याचे लक्षात आल्यावर ट्रक सावनेर तहसील कार्यालयात कारवाहीसाठी नेण्याचा प्रयत्न नांदूरकर यांनी केला. महसूल कार्यालय सावनेर येथे महसुलचे अधिकारी गाळी कारवाईसाठी नेत असल्याची माहिती ट्रक मालक प्रफुल कापसे सावनेर यांना व त्याचा लहान भाऊ प्रफुल कापसे आणि त्यांचा दिवानजी रोशन महंत यांना ट्रक चालकाने दिली. उत्तम कापसे यांचा दिवानजी रोशन महंत हा तिबोले नावाच्या त्याच्या साथीदारांसह ट्रक जवळ आला. रोशन याने शरद नांदूरकर यांच्याशी वाद घालुन गैरवर्तन केले. नांदूरकर ट्रक सोडायला तयार नसलेले बघून रोशन याने प्रफुल कापसे आणि उत्तम कापसे यांना माहिती दिली. दोघेही घटनास्थळी पोहचले. रेतीचे रॉयल्टी असल्याची उत्तम कापसे यांनी नांदूरकर यांनी म्हटले. मात्र रॉयल्टी उत्तम कापसे यांनी सादर केली नाही. रेतीच्या वाहतूक दरम्यान रॉयल्टी ही ट्रक चालकसोबत असणे गरजेचे असते या नियमावर बोट ठेवून ट्रक तहसील कार्यालयात घेऊन जाण्यास नांदूरकर ठाम होते. तशी माहिती त्यांनी वरिष्ठ अधिका?्यांना दिलेली होती. उत्तम कापसे हे दारू पिउन होते आणि त्यांनी अभद्र वागणूक सुरू केले असता मोबाईलमध्ये त्याची व्हिडीओ शुटीग केली असे तक्रारीत फिर्यादीकडून तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. उत्तम कापसे यांची व्हिडीओ शूटिंग करत असल्याचे पाहून प्रफुल कापसे याने प्रथम नांदूरकर यांना मारहाण केली व नंतर उत्तम कापसे आणि रोशन महंत यांनी मारहाण केली. शरद नांदूरकर यांनी ट्रक सावनेर तहसील मध्ये कारवाहिस्तव जमा करून सावनेर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यास गेले मात्र घटनास्थळ हे खापा पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याने शरद नांदूरकर यांनी खापा पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार दिली.
खापा पोलीस स्टेशन हद्दीत रामडोंगरी ( क ) या रेती घाटा तील रेतीच्या साठ्याची उचल करण्याची परवानगी उत्तम कापसे यांनी नियमानुसार मिळवली आणि या रेतीची रात्री वाहतुक करण्याची परवानगी असल्याने साठ्यातून रेतीचे उचल करून रात्री वाहतूक केल्या जात होती. एकाच रॉयल्टीचा उपयोग एकदाच करण्याचा नियम आहे मात्र रेती तस्कर एका रॉयल्टीवर अनेकदा रेतीची वाहतूक करीत असतात. नेमका हाच प्रकार या प्रकरणात घडला.
महिला अधिकारीलाही केली होती शिवीगाळ
सावनेरच्या महिला नायब तहसीलदार दराडे यांनाही पहाटे सावनेर पोलीस स्टेशन हद्दीत उत्तम कापसे यांचा रेतीने भरलेला ट्रक मिळून आला होता. यावर कारवाईस्तव ट्रक नेत असतांना उत्तम कापसे यांनी दराडे यांच्याशी अभद्र वागणूक केली होती तेव्हा त्यांनीही सावनेर पोलीस स्टेशन मध्ये दाद मागितली होती.
सावनेर ताल्युक्यातील वाकी रामडोंगरी गोसेवाडी , रायवाडी सह वलणी या रेतिघाटांवर रेती माफियांची दहशत गेल्या दशकापासून कायम आहे. तहसीलदार असो व पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्यावर हल्ला आणि पिस्तुल कनपटीवर लावण्याचा प्रकार येथे घडून चुकला आहे. नुकतेच वारेगाव येथे रेती चोरी वरून मंगेश बागडे या युवकाचा खून करण्यात आला. या पूर्वी वलणी , भानेगाव , सील्लेवाडा येथे रेती तस्करीवरून चर्चित असे हत्याकांड झाले. विशेष म्हणजे अवैध पिस्तुले या रेती माफियांकडे असल्याने रेती माफियांनी दहशत परिसरात कायम आहे. रेतिघंटावर साठवलेली रेती उचलण्याची परवानगी घेऊन त्या माध्यमातून नदीच्या पात्रात पाण्यातील रेती पोकल्यान मशीन , जेसीबी मशीन ने उचल करून ट्रक , ट्रॅक्टरद्वारे उचलून साठवलेल्या जागी पुन्हा टाकली जाते. यामुळे महसूल ची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे आणि रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. तहसिलदाराने प्रत्येक रेती घाटावर महसूल कर्मचारी आणि सोबत पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त ठेवला आहे मात्र रेती माफियांची दहशत असल्याने बेधडक त्यांची रेती वाहतूक त्यांच्या समोरून सुरूच आहे. रेती घाटावरून रेती माफियाची दहशत गुंडागर्दी बंद करण्याची मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीने विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार यांना निवेदन देऊन केली आहे.
तहसीलदार दीपक करंडे : सावनेर तहसील कार्यालयात जमा ट्रक वर नियमानुसार दंडात्मक कारवाही केली जाईल