रेवराल रेल्वेस्थानक कात टाकतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 01:26 AM2017-10-06T01:26:27+5:302017-10-06T01:26:43+5:30

सर्वसामान्य, गोरगरिबांना सुखकर प्रवास घडविणाºया रेवराल रेल्वेस्थानकाचा कायापालट होत आहे.

Reverral railway station can be used | रेवराल रेल्वेस्थानक कात टाकतेय

रेवराल रेल्वेस्थानक कात टाकतेय

Next
ठळक मुद्देप्रवाशांची गर्दी वाढली : उड्डाण पुलासह विकास कामे प्रगतिपथावर

अशोक हटवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मौदा : सर्वसामान्य, गोरगरिबांना सुखकर प्रवास घडविणाºया रेवराल रेल्वेस्थानकाचा कायापालट होत आहे. अवघ्या १० रुपयांमध्ये नागपूर आणि १५ रुपयात गोंदियाकडे जाणे सर्वांच्याच खिशाला परवडणारे असल्याने प्रवाशांची गर्दीदेखील वाढत आहे. प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागतो. यामुळे या मार्गावर रेल्वेला अतिरिक्त डबे जोडण्यात यावे, अशा प्रतिक्रिया प्रवाशांमध्ये उमटत आहे. दुसरीकडे उड्डाण पूल व इतर विकास कामे प्रगतिपथावर असल्याने हे रेल्वेस्थानक दिलासा देणारेच ठरत आहे.
दक्षिण- पूर्व-मध्य रेल्वेच्या रेवराल स्थानकावर विकासाच्या अनेक सोईसुविधा उपलब्ध होत आहे. मौदा तालुक्यातील सुमारे ४० गावातील प्रवाशांसाठी हे रेल्वेस्थानक सोईचे ठरते. या स्थानकावरून दिवसभरात जाण्यासाठी सहा तर येण्यासाठी सहा प्रवासी रेल्वेगाड्या धावतात. सहा गाड्या असतानाही रेवराल स्थानकावरून बसणाºया प्रवाशांना आसन मिळत नाही. यामुळे एक ते दीड तास उभे राहूनच प्रवास करावा लागतो. यात महिला व वृद्धांची मोठी गैरसोय होते. ही प्रवाशांची गैरसोय पाहता रेल्वे प्रशासनाने सहा गाड्यांना अतिरिक्त बोगी जोडण्याची गरज आहे.
या रेल्वे स्थानकावर गेल्या वर्षी उड्डाण पुलाचे काम सुरू केले. ते आता अंतिम टप्प्यात आहे. फलाटांची उंची वाढवून पेव्हिंग टाईल्स लावल्या जात आहे. प्रेरणादायी शौचालयासह अनेक कामे प्रगतिपथावर आहेत.
तालुक्यातील राजोली, खरडा, खंडाळा, पिपरी, चारभा, नांदगाव, कोदामेंढी, सावंगी, इंदोरा, बोरी (घिवारी), धानोली, वाघबोडी, अडेगाव, कथलाबोडी, वाकेश्वर, सुकळी, खिडकी, तोंडली, श्रीखंडा आदी गावे रेवराल रेल्वेस्थानकाला संलग्न असून येथील नागरिक, व्यापारी, शेतकरी, मजूर, कर्मचारी आदी मोठ्या संख्येने या स्थानकावरून अल्पदरात रेल्वेच्या प्रवासाला पसंती देतात.

रोजगार निर्मितीचे
केंद्र ठरणार
दिवसागणिक वाढणारी प्रवासी संख्या आणि रेल्वेस्थानकाचा झपाट्याने होणारा कायापालट पाहता रेवराल स्थानक विभिन्न रोजगार निर्मितीचे केंद्र ठरणार आहे. रेवराल स्थानकावर पोहचवून देणारी टॅक्सी, शेतमाल, फळे आदी दुसºया शहरात पाठविण्यासाठी व्यवस्था या स्थानकावरून होणे सहज शक्य आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तातडीने सर्व सहा प्रवासी गाड्यांना अतिरिक्त डबे जोडून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.

दररोज सहा गाड्यांचे आवागमन
रेवराल स्थानकावरून टाटा-इतवारी, गोंदिया-इतवारी, तिरोडा-इतवारी, गोंदिया - इतवारी मेमू, रायपूर-इतवारी या सहा प्रवासी गाड्या इतवारी, नागपूरकडे धावतात. तसेच इतवारी-रायपूर, इतवारी- गोंदिया मेमू, इतवारी-तुमसर-तिरोडा, इतवारी-गोंदिया, इतवारी- गोंदिया मेमू आणि इतवारी-टाटा अशा गोंदियाकडे जाणाºया प्रवासी रेल्वेगाड्यांचे दररोज आवागमन होते.

Web Title: Reverral railway station can be used

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.