अन्न सुरक्षा योजनेचे पुनर्सर्वेक्षण करा

By admin | Published: July 31, 2014 01:10 AM2014-07-31T01:10:49+5:302014-07-31T01:10:49+5:30

अन्न सुरक्षा योजनेचे काळजीपूर्वक सर्वेक्षण झाले नसल्याने त्याचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळत नाही. यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी पुनर्सर्वेक्षण

Review the food security scheme | अन्न सुरक्षा योजनेचे पुनर्सर्वेक्षण करा

अन्न सुरक्षा योजनेचे पुनर्सर्वेक्षण करा

Next

चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले तालुका प्रशासनाला निर्देश
कामठी : अन्न सुरक्षा योजनेचे काळजीपूर्वक सर्वेक्षण झाले नसल्याने त्याचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळत नाही. यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी पुनर्सर्वेक्षण करावे, असे निर्देश आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठीचे तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांना दिले.
कामठी तालुक्यातील वडोदा पंचायत समिती क्षेत्रातील वडोदा, उमरी, एकर्डी, सेलू, निंबा, परसाड, केम, आडका, टेमसना, कुसुंबी, पांढरकवडा, परसोडी, खेडी, तरोडी (बु.), बिडगाव आदी गावात चंद्रशेखर बावनकुळे यांनी गावसंपर्क अभियान राबवून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यात अन्न सुरक्षा योजनेबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तहसीलदारांना निर्देश दिले. प्रत्येक गावातील नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून अनियमित आणि अपुरे धान्य मिळते. तसेच रॉकेल मिळत नाही, अशा लेखी तक्रारी नागरिकांनी दिल्या. अन्न सुरक्षा योजनेचा लाभ सर्वसामान्यांना न मिळता श्रीमंताना मिळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. लाभार्थ्यांची यादी तयार करण्यासाठी सरपंच, ग्रामसभा व इतरांना विश्वासात घेतले नाही, पैसे लाटले, असाही आरोप नागरिकांनी केला. नागरिकांच्या या समस्या ऐकल्यानंतर अन्न सुरक्षा योजनेसाठी पुनर्सर्वेक्षण करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी तहसीलदारांना दिले. तसेच तहसील प्रशासनाविरोधात जनहित याचिका दाखल करू, असे सांगितले.
दौऱ्यात जिल्हा परिषद सदस्य विनोद पाटील, पंचायत समिती सभापती संगीता तांबे, उपसभापती विमल साबळे, पंचायत समिती सदस्य अनिता चिकटे, भाजपचे तालुकाध्यक्ष रमेश चिकटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल निधान, माजी सभापती रामकृष्ण वंजारी, उमेश महल्ले, संजय खराबे, भैया टाले, रमेश चांभारे, बंडू ठाकरे, शशिकांत गजभिये, नाना आकरे, कैलास घोडमारे, बंडू लेंडे, विशाल चामट, निकेश कातुरे उपस्थित होते. यावेळी सरपंच मंदा सुब्बा, रिता हरीणखेडे, बेबीनंदा मेश्राम, राजू थोटे, सुनंदा लांजेवार, विनोद शेंडे, अमोल खोडके, उपसरपंच संतोष शेंद्रे, बंडू ठाकरे, होमेश्वर गेडेकर, संगीता शेंडे, गेंदलाल सेलोकर, आशिष भगत, चांभारे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Review the food security scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.