स्वच्छता कर्मचारी आयोगाची आढावा बैठक

By admin | Published: May 30, 2017 01:43 AM2017-05-30T01:43:06+5:302017-05-30T01:43:06+5:30

राष्ट्रीय स्वच्छता कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप के. हाथीबेड यांनी अलीकडेच महावितरणमध्ये आढावा बैठक घेतली.

A review meeting of the Cleanliness Employee Commission | स्वच्छता कर्मचारी आयोगाची आढावा बैठक

स्वच्छता कर्मचारी आयोगाची आढावा बैठक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वच्छता कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप के. हाथीबेड यांनी अलीकडेच महावितरणमध्ये आढावा बैठक घेतली.
महावितरणच्या विद्युत भवन येथील मुख्यालयात ही बैठक पार पडली. या बैठकीला महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता रफीक शेख, अधीक्षक अभियंता मनीष वाठ, राकेश जनबंधू, कार्यकारी अभियंता एच. पी, गिरधर, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे, उपविधी अधिकारी संदीप केणे, सुभाष नंदनवार, पी. आर. खोटे, डॉ. अनिल बघेल, पी.सी. देवतळे व पी.डी. पाथे प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीदरम्यान महावितरणमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांबद्दल असलेले धोरण, लाड-पागे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि कंत्राटी स्वच्छता कर्मचारी आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान, हाथीबेड यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पुर्नवसन, त्यांचे सामाजिक सबलीकरण, कंत्राटी स्चच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन, भविष्य निर्वाह निधी व आरोग्य विमा विषयांचा आढावा घेतला.

Web Title: A review meeting of the Cleanliness Employee Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.