नरखेड येथे आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:09 AM2021-05-07T04:09:57+5:302021-05-07T04:09:57+5:30

नरखेड : स्थानिक पंचायत समिती सभागृहात बुधवारी (दि. ५) राज्याचे माजी गृहमंत्री तथा आमदार अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत विशेष ...

Review meeting at Narkhed | नरखेड येथे आढावा बैठक

नरखेड येथे आढावा बैठक

Next

नरखेड : स्थानिक पंचायत समिती सभागृहात बुधवारी (दि. ५) राज्याचे माजी गृहमंत्री तथा आमदार अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक घेण्यात आली. यात तालुक्यातील काेराेना संक्रमण आणि उपाययाेजना यावर विचारविमर्श करण्यात आला.

तहसीलदार जी. डी. जाधव यांनी जानेवारी ते ४ मेपर्यंतचे तालुक्यातील गावनिहाय काेराेना संक्रमित, मात केलेले व उपचार सुरू असलेले रुग्ण, मृत रुग्णांची संख्या, चाचण्या व लसीकरणाचा अहवाल सादर केला. पहिल्या लाटेत ३,४७३ तर दुसऱ्या लाटेत एकूण ५,६१३ जणांना काेराेनाची लागण झाली असून, ३,६१३ रुग्णांनी काेराेनावर मात केली तर, ७६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील १,९२५ रुग्ण विलगीकरण कक्षात तर, १,८७२ रुग्ण गृहविलगीकरणात असल्याचे तसेच सध्या लोकमान्य मतिमंद व कर्णबधिर विद्यालय, शासकीय औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेतील कोविड केअर सेंटरमध्ये ५८ रुग्ण उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. ऑक्सिजन बेडची कमतरता असल्याचेही सांगण्यात आले. ५० रुग्णांना पुरेल एवढा ऑक्सिजन साठा साठवून ठेवण्यासाठी ६० हजार लिटर क्षमतेची ऑक्सिजन टँक तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, अशी माहिती आ. अनिल देशमुख यांनी दिली असून, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरेाग्य केंद्रांना आवश्यक साहित्याचा पुरवठा केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काेराेना चाचणी किटचा तुटवडा, रिपाेर्ट येण्यास हाेणारा विलंब, काेराेना रुग्णांचा मुक्तसंचार, घराबाहेर विलगीकरणाची साेय, इमारत बांधकाम योजना तसेच श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजना, माेफत धान्य वाटप, कर्जवसुलीसाठी मायक्रो फायनान्सवाल्यांचा तगादा, लसीकरणाचे १०० टक्के उद्दिष्ट, त्यासाठी जनजागृती करणे यासह अन्य विषयांवर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी सूचना देण्यात आल्या. बैठकीला उपविभागीय अधिकारी (महसूल) श्रीकांत उंबरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव, पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर, उपसभापती वैभव दळवी, पालिकेचे मुख्याधिकारी प्रवीण मानकर व पल्लवी राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. हरीश महंत, वैद्यकीय अधिकारी डाॅ. वेखंडे, संजय चरडे, अनिल साटोणे, नरेश अरसडे, मनीष फुके, नंदलाल मोवाडे, नरेश तवले, सुनील बालपांडे, उत्तम बलवीर, रामदास गुजरकर, जाकीर शेख उपस्थित होते.

Web Title: Review meeting at Narkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.