ग्रामीण रुग्णालयात आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:09 AM2021-05-09T04:09:56+5:302021-05-09T04:09:56+5:30
रेवराल : माैदा येथील ग्रामीण रुग्णालयात शनिवारी (दि. ८) आढावा बैठक घेण्यात आली. यात काेराेना संक्रमण, रुग्णालयातील सुविधा व ...
रेवराल : माैदा येथील ग्रामीण रुग्णालयात शनिवारी (दि. ८) आढावा बैठक घेण्यात आली. यात काेराेना संक्रमण, रुग्णालयातील सुविधा व इतर बाबींचा आढावा घेण्यात आला.
या ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनचे ४० जम्बाे सिलिंडर, ४० ऑक्सिजन फ्लो मीटर, माैदा तालुक्याला चार रुग्णवाहिका, १० बायपास मशीन, १० ऑक्सिजन काॅन्सेंट्रेटर मशीन आणि चार व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. या सर्व बाबींची लवकरच पूर्तता केली जाणार असल्याची माहिती आ. आशिष जयस्वाल यांनी यावेळी दिली. बैठकीला तहसीलदार प्रशांत सांगडे, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रुपेश नारनवरे, डॉ. ध्यानेश्वर सोनसरे, देवेंद्र गोडबोले, सदुकर हटवार, जितू साठवणे, दुर्गेश थोटे, तुकाराम मेहर, अक्षय पंचबुद्धे आदी उपस्थित होते.