प्रधान मुख्य वन संरक्षकांकडून ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:07 AM2021-07-11T04:07:34+5:302021-07-11T04:07:34+5:30
नगपूर : राज्याचे प्रधान सचिव (वने) वेणूगोपाल रेड्डी आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी शनिवरी ट्रान्झिट ट्रीटमेंट ...
नगपूर : राज्याचे प्रधान सचिव (वने) वेणूगोपाल रेड्डी आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी शनिवरी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला भेट देऊन कामाचा आणि भविष्यातील विकासकामांचा आढावा घेतला.
देशात एकमेव असलेले ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर नागपुरात आहे. अपघातग्रस्त किंवा आजारी असलेल्या वन्यजीवांना येथे आणून उपचार केले जातात. बरे झाल्यावर पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाते. या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरची कामगिरी पाहण्यासाठी वनविभागाचे प्रधान सचिव आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी भेट दिली. यावेळी मंत्रालय मुंबई येथील सहसचिव अरविंद आपटे, गजेंद्र नरवणे, संजीव गौड, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी केंद्राची कामगिरी व वन्यजीवांच्या उपचारासाठी असलेल्या सोई बघण्यास भेट दिली.२०१५ पासून सेवेत असलेल्या या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरची कामगिरी पाहून अधिकाऱ्यांनी कौतूक केले. केंद्राचे आधुनिकीकरण करण्यासंदर्भात चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार या केंद्राचे आधुनिकीकरण व महाराष्ट्रात होणाऱ्या ११ ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या कामाचा आढावा घेतला.
भेटीदरम्यान वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य कुंदन हाते, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद बिलाल अली यांनी केंद्राच्या प्रगतीचे व आधुनिकीकरण करण्यासंदर्भात सादरीकरण केले. यावेळी सहायक वनसंरक्षक सुरेंद्र काळे, सहायक वनसंरक्षक गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी गंगाधर जाधव, विजय गंगावणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.