विजय वडेट्टीवार यांनी घेतला महाज्योती कार्यालयात आढावा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:10 AM2020-12-31T04:10:51+5:302020-12-31T04:10:51+5:30
नागपूर : राज्याचे मदत व पुनर्वसन तसेच इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी ‘महाज्योती’च्या नागपूरस्थित कार्यालयाला ...
नागपूर : राज्याचे मदत व पुनर्वसन तसेच इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी ‘महाज्योती’च्या नागपूरस्थित कार्यालयाला भेट देऊन संपूर्ण उपक्रमाचा आढावा घेतला. ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी उपक्रमाच्या सद्यस्थितीची माहिती दिली.
राज्यागील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बळकटीकरणासाठी, युवा, शेतकरी, महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी ‘महाज्योती’ कार्यरत आहे. या माध्यमातून सुरू करण्यात येत असलेल्या योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, तसेच महाज्योतीतर्फे इमाव, विजाभज, विमाप्र व धनगर समाज घटकातील युवांसाठी पोलीस भरतीपूर्व ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. त्यासाठी तसेच सीईटी/जेईई/एनईईटी परीक्षापूर्व मार्गदर्शनासाठीही महाज्योतीच्या संकेतस्थळावर १० जानेवारी २०२१ पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन वडेट्टीवार यांनी यावेळी केले.