राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सवात रंगणार क्रांतिकारकांचे चरित्र
By admin | Published: January 11, 2016 02:56 AM2016-01-11T02:56:46+5:302016-01-11T02:56:46+5:30
राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सवात रंगणार क्रांतिकारकांचे चरित्र
कीर्तन महोत्सव आयोजन समिती :
राधागोविंद चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजन
नागपूर : cआयोजन मंगळवार १२ ते १७ जानेवारी दरम्यान चिटणीस पार्क, महाल येथे करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त कीर्तन महोत्सव परिसराला त्यांचे नाव देण्यात येणार आहे. पोद्दारेश्वर राम मंदिरातर्फे काढण्यात येणाऱ्या श्रीराम शोभायात्रेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने हा महोत्सव या शोभायात्रेला समर्पित करण्यात येणार असून महोत्सवात देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या क्रांतिकारकांचा जागर कीर्तनाच्या माध्यमातून होईल, अशी माहिती समितीचे संयोजक श्रीपाद रिसालदार आणि प्रेरक दिगंबरबुवा नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवाचा प्रारंभ १२ जानेवारी रोजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, राम हरकरे, स्वामी प्रफुल्लजी, रामकृष्ण पोद्दार, आ. विकास कुंभारे यांच्या उपस्थितीत सायंकाळी ६ वाजता करण्यात येईल. यानंतर सुप्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांच्या गीतरामायणचे आयोजन करण्यात आले आहे. १३ जानेवारी रोजी युवा कीर्तनकार संदीप मांडके ‘शहीद भगतसिंग’ विषयावर कीर्तन करतील. १४ जानेवारी रोजी सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ विषयावर कीर्तन होईल. याप्रसंगी सद्गुरुदास महाराज प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. १५ जानेवारी रोजी राष्ट्रीय कीर्तनकार श्यामबुवा धुमकेकर यांचे ‘नरव्याघ्र तानाजी मालुसरे’ विषयावर कीर्तन होईल. १६ जानेवारी रोजी राष्ट्रीय कीर्तनकार मानसी बडवे यांचे ‘पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर’ विषयावर कीर्तन होईल. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. १७ जानेवारी रोजी ज्येष्ठ कीर्तनकार प्रा. न. चि. अप्पामार्जने यांचे ‘गुरु गोविंद सिंग’ यांच्यावर हिंदी भाषेत कीर्तन होणार आहे. याप्रसंगी जितेंद्रनाथ महाराज, नवनीतसिंग तुली, बलबीरसिंग रेणु, माधवदास ममतानी, रजवंतसिंग तुली उपस्थित राहणार आहे. (प्रतिनिधी)