दीक्षांत झाल्यावर लगेच ‘आॅनलाईन’ पदवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:13 AM2017-10-31T00:13:22+5:302017-10-31T00:14:38+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०४ वा दीक्षांत समारंभ खºया अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०४ वा दीक्षांत समारंभ खºया अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. दीक्षांत समारंभानंतर पदवीसाठी विद्यार्थ्यांना महिनोंमहिने प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र ‘एनएसडीएल’सोबत विद्यापीठाला ‘लिंक’ करण्यात आले असून या माध्यमातून दीक्षांत समारंभानंतर दुसºया दिवशीच विद्यार्थ्यांना पदवीची ‘आॅनलाईन’ प्रत मिळू शकणार आहे. शिवाय पदवीची मूळ प्रतदेखील महिनाभरात विद्यार्थ्यांच्या हाती राहील, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी दिली.
देशभरात बोगस शैक्षणिक प्रमाणपत्रांची प्रकरणे वाढली आहे. अशा प्रकारे कुणाचीही फसवणूक होऊ नये व विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाची अशी ही कागदपत्रे सुरक्षित राहावीत यासाठी केंद्र शासनाने ‘एनएडी’ सेवा सुरू करण्याची घोषणा केली. यासंदर्भात ‘एनएसडीएल’ व ‘सीडीएल’ या केंद्र शासनाने नेमलेल्या दोन कंपन्यांसोबत विद्यापीठाने दोन्ही कंपन्यांशी सामंजस्य करार केला आहे. यानुसार आता दीक्षांत समारंभात पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे ‘डिजिटल’ करण्यात येतील. विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे जगातून कुठूनदेखील पाहता येतील. यासंदर्भात विद्यार्थ्यांना ‘आॅनलाईन’ नोंदणी करावी लागेल. त्यानंतर त्यांना ‘युजर आयडी’ व ‘पासवर्ड’ देण्यात येईल.
ही सेवा विद्यार्थ्यांना विनामूल्य उपलब्ध आहे. दीक्षांत समारंभ झाल्यानंतर लगेच दुसºया दिवशी ही ‘लिंक’ विद्यार्थ्यांसाठी खुली होईल. याची सूचना लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे डॉ.येवले यांनी सांगितले.
यासंदर्भात ‘एनएसडीएल’कडे सर्व विद्यार्थ्यांची माहिती व सखोल ‘डाटा’ उपलब्ध करून देण्यात आला असून ‘सॉफ्टकॉपी’ तयार करण्याचे काम जवळपास पूर्णत्वाकडे आहे, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांची पायपीट वाचणार
पदवी, गुणपत्रिका यांचे सत्यापन करण्यासाठी विद्यार्थी तसेच बाहेरील कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज येतात. शिवाय ‘प्रोव्हिजनल’ प्रमाणपत्र, पदवी पडताळणी इत्यादीमुळेदेखील मनुष्यबळावर ताण पडतो. जगातील अनेक विद्यापीठांत ही सर्व कागदपत्रे ‘आॅनलाईन’ उपलब्ध असून त्यांचे सत्यापन सुकर पद्धतीने होते. त्यामुळे या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांची पायपीट वाचेल.