माहिती अधिकार कायद्याचा उपयोग जनहितासाठी व्हावा : राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2022 12:04 PM2022-06-08T12:04:44+5:302022-06-08T12:26:43+5:30

माहितीचा कायदा ठराविक मर्यादेत न राहता व्यापक जनहिताच्या दृष्टीने सर्वांनीच या कायद्याचा वापर करावा, असे आवाहन नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी केले.

Right to Information Act should be used for public interest says State Information Commissioner Rahul Pande | माहिती अधिकार कायद्याचा उपयोग जनहितासाठी व्हावा : राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे

माहिती अधिकार कायद्याचा उपयोग जनहितासाठी व्हावा : राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे

googlenewsNext

नागपूर : आधी सामान्य नागरिकांना प्रशासनाकडून कोणतीही माहिती मिळत नव्हती. माहितीचा अधिकार कायद्यामुळे ही समस्या दूर झाली. हा एक प्रभावी कायदा आहे. या कायद्याचा केवळ जनहितासाठी उपयोग होणे गरजेचे आहे, असे मत राज्य माहिती आयोगाच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचे आयुक्त राहुल पांडे यांनी मंगळवारी ‘माध्यम संवाद’ कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. हा कार्यक्रम माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. 

सध्या अनेक जण वाईट हेतू साध्य करण्यासाठी या कायद्याचा उपयोग करीत आहेत. अशा प्रवृत्तीवर वचक निर्माण करणे आवश्यक आहे. याशिवाय अनेक जण विविध माहितीसाठी दरवर्षी हजारो अर्ज दाखल करतात. अशा व्यक्तींमुळे प्रशासनाला मनस्ताप सहन करावा लागतो. औरंगाबाद खंडपीठांतर्गतच्या १३ व्यक्तींनी वेगवेगळ्या विभागांमध्ये आठ हजारावर अर्ज दाखल केले आहेत. परिणामी, एका व्यक्तीने किती अर्ज दाखल करावे, यावर मर्यादा आणणे आवश्यक झाले आहे, असेही पांडे यांनी सांगितले.

याप्रसंगी आयोगाच्या उपसचिव रोहिणी जाधव, कक्ष अधिकारी नंदकुमार राऊत, दीपाली शाहारे, माहिती विभागाचे माध्यम समन्वय अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके उपस्थित होते.

Web Title: Right to Information Act should be used for public interest says State Information Commissioner Rahul Pande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.