‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’ मध्ये ऋषभ गेडाम नागपुरात ‘टॉप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 11:00 AM2018-06-11T11:00:17+5:302018-06-11T11:00:26+5:30

‘आयआयटी’मध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’चा निकाल रविवारी जाहीर झाला. शहरातून दिल्ली पब्लिक स्कूलचा विद्यार्थी ऋषभ गेडाम हा अव्वल क्रमांकावर राहिला.

Rishabh Gedam in 'JEE-Advanced' 'Top' in Nagpur | ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’ मध्ये ऋषभ गेडाम नागपुरात ‘टॉप’

‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’ मध्ये ऋषभ गेडाम नागपुरात ‘टॉप’

Next
ठळक मुद्दे५० हून अधिक विद्यार्थी पात्र

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘आयआयटी’मध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’चा निकाल रविवारी जाहीर झाला. शहरातून दिल्ली पब्लिक स्कूलचा विद्यार्थी ऋषभ गेडाम हा अव्वल क्रमांकावर राहिला. त्याने देशपातळीवर १३० वा क्रमांक पटकाविला. नागपूर शहरातून ५० हून अधिक विद्यार्थी चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले असल्याची माहिती विविध महाविद्यालयांतून प्राप्त झाली.
‘जेईई-मेन्स’मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’साठी पात्र ठरले होते. २० मे रोजी ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’ची परीक्षा पार पडली. ‘जेईई-मेन्स’मध्ये ऋषभ गेडामचा अखिल भारतीय पातळीवर १ हजार २७ वा क्रमांक होता. मात्र ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’मध्ये त्याने सर्वांना चकित केले. ‘एससी’ प्रवर्गात तो देशपातळीवर तिसºया क्रमांकावर आहे हे विशेष. ऋषभपाठोपाठ जी.एच.रायसोनी विद्यानिकेतनचा हितेश कंदाला (एआयआर-१६८) याने बाजी मारली. त्याचप्रमाणे मोहम्मद तौफिक (एआयआर-३०३), वेदांत बंग (एआयआर-५१९), हर्षद इंगोले (एआयआर-८१०), निर्मल कार्तिक (एआयआर-१०३४), आशय पल्लीवार (१९१६) यांनीदेखील पहिल्या दोन हजार विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळविण्यात यश मिळविले. शिवाजी विज्ञान महाविद्यालयातून ३० विद्यार्थी चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून ‘आयआयटी’ प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

सरावातूनच मिळाले यश : ऋषभ गेडाम
 ‘जेईई-मेन्स’मध्ये काहीशा माघारलेल्या ऋषभ गेडाम याने ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’मध्ये मेहनतीच्या भरवशावर यश मिळविले. मी ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’च्या अभ्यासासाठी वेगळा ‘पॅटर्न’ अवलंबिला होता. दररोज ३ ते ४ पेपर्स सोडविण्यावर माझा भर रहायचा. त्यानंतर ज्या प्रश्नांत अडचण आली, ते मुद्दे सखोल वाचायचो. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. ‘आयआयटी’तून अभियांत्रिकीचा अभ्यास करण्याचे अगोदरपासूनचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण होणार असल्याचे समाधान आहे. ‘आयआयटी-पवई’ येथून संगणक विज्ञान विषयात अभियांत्रिकी करणार असल्याचे ऋषभने सांगितले. आपल्या यशाचे श्रेय त्याने आई नंदा, वडील राजेश व ‘वायआरसीई ग्रुप’च्या ‘पेस आयआयटी व मेडिकल’ला दिले आहे.

नियमित अभ्यासावर भर : हितेश कंदाला
जी.एच.रायसोनी विद्यानिकेतनचा विद्यार्थी असलेल्या हितेश हेमराय कंदाला याचा ‘जेईई-मेन्स’मध्ये ३७ वा क्रमांक होता. मी वर्षभर नियमित अभ्यासावर भर दिला होता. सोबतच सरावदेखील सुरू होता. निकाल अपेक्षित होता. ‘आयआयटी-पवई’ येथून ‘इलेक्ट्रीकल’ शाखेत पदवी घ्यायची आहे, असे हितेशने सांगितले.

वर्षभराच्या मेहनतीचे फळ : मोहम्मद तौफिक
रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूलचा विद्यार्थी मोहम्मद तौफिक याने आपल्या यशाचे श्रेय वडील डॉ.मोहम्मद अतिक व आई सर्वत अंजुम यांना दिले आहे. वडील डॉक्टर असले तरी मला अभियांत्रिकीतच रस होता. ‘जेईई-मेन्स’मध्ये अखिल भारतीय पातळीवर ३३२ वा क्रमांक होता. वर्षभर नियमित अभ्यासावर भर दिला. त्याचेच फळ मिळाले. ‘आयआयटी-पवई’ येथून मला संगणक विज्ञान शाखेत अभियांत्रिकी करायचे आहे, असे त्याने सांगितले.

Web Title: Rishabh Gedam in 'JEE-Advanced' 'Top' in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा