नावाप्रमाणेच 'रईस'.. नागपूरच्या 'या' चहावाल्याला नक्कीच भेटा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2022 10:44 AM2022-03-11T10:44:51+5:302022-03-11T11:26:11+5:30
दिनेशनं परिस्थिती कशीही असली तरी त्याला तोंड दिल. खचून न जाता स्वताच्या पायावर उभा राहीला.
सुरभी शिरपूरकर
नागपूर : हा आहे नागपूरचा रईस चायवाला...पण याचं खरं नाव दिनेश खोब्रागडे. दिनेश दिव्याांग आहे. त्याची नागपूरात आयटी पार्कमध्ये चहाची टपरी आहे. या टपरीची ओळख रईस चायवाला अशी आहे. विशेष म्हणजे दिनेश उच्च शिक्षीत आहेत. त्यानं एमए पर्यंतचं शिक्षण घेतलंय. शरीर साथ देत नव्हतं, पण त्यातून खचून न जाता चिकाटीनं त्यांनं हा व्यवसाय उभा केला.
दिनेशच्या मदतीचा त्याचा मोठा भाऊ संदिपही असतो. घरी वृद्ध आई आहे. तिला या वयात जास्तीत जास्त आनंदी ठेवायचं, यासाठी ते दिवस रात्र मेहनत घेतायत.
दिनेशचं कोरोना काळात शिक्षण पूर्ण झालं. उच्च शिक्षित असून सुद्धा त्याला नोकरी मिळत नव्हती. मग त्याने निश्चय केला आणी थेट चहाचा व्यवसाय सुरू केला. दिनेशनं परिस्थिती कशीही असली तरी त्याला तोंड दिल. खचून न जाता स्वताच्या पायावर उभा राहीला. त्यानं खरोखरच जगायचं कसं याचं उत्तम उदाहरण सर्वांनाच दिलय. त्यामुळे नागपूरकरांसाठी हा रईस चायवाला खास ठरतो.