सार्वजनिक शौचालयामुळे कोरोना संसर्गाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 07:03 PM2020-05-12T19:03:14+5:302020-05-12T19:06:24+5:30

शहरात ४२४ झोपडपट्ट्या असून यातील अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालये आहेत. अशा परिसरात संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Risk of corona infection due to public toilets | सार्वजनिक शौचालयामुळे कोरोना संसर्गाचा धोका

सार्वजनिक शौचालयामुळे कोरोना संसर्गाचा धोका

Next
ठळक मुद्देनागपूर शहरात ६८ सार्वजनिक शौचालय : स्लम भागात भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. लकडगंज झोनवगळता अन्य सर्व नऊ झोनमध्ये बाधित रुग्ण आढळले आहेत. संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मात्र शहरात ४२४ झोपडपट्ट्या असून यातील अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालये आहेत. अशा परिसरात संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
शहरातील ४२४ झोपडपट्ट्यांपैकी २९३ शासन राजपत्र घोषित करण्यात आल्या आहेत. तर १३१ अघोषित आहेत. यातील अनेक झोपडपट्ट्या खासगी मालकीच्या जागेवर वसलेल्या आहेत. अशा झोपडपट्ट्यांमध्ये नागरी सुविधांचा अभाव आहे. या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाचा वापर केला जातो. यात एखादा बाधित रुग्ण असल्यास इतरांना संसर्ग होण्याचा धोका आहे.
नागपूर शहरात हॉटस्पॉट ठरलेल्या गांधीबाग व सतरंजीपुरा झोनमध्ये २५ शौचालये आहेत. या शौचालयांचा वापर झोपडपट्टीत वास्तव्यास असलेले नागरिक करतात. परंतु येथे स्वच्छता ठेवली जात नाही, निर्जंतुकीकरण केले जात नाही. काही ठिकाणी पाण्याची सोय नाही. यामुळे बाधा होण्याची शक्यता आहे.

अनधिकृत झोपडपट्टीत पाण्याची सोय नाही
सार्वजनिक विहीर वा अन्य ठिकाणांहून पाणी आणावे लागते. गर्दीमुळे बाधा होण्याची शक्यता आहे. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

झोननिहाय सार्वजनिक शौचालये
लक्ष्मीनगर -१
धरमपेठ -१६
हनुमाननगर -४
धंतोली -६
नेहरूनगर -३
गांधीबाग -१६
सतरंजीपुरा -९
लकडगंज- १
आसीनगर-६
मंगळवारी-६
 

Web Title: Risk of corona infection due to public toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.