शहरात डेंग्यूचा धोका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:07 AM2021-07-15T04:07:59+5:302021-07-15T04:07:59+5:30
जुलै महिन्यात आढळले ८५ रुग्ण: दंडात्मक कारवाईचे निर्देश लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहारात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून १ ...
जुलै महिन्यात आढळले ८५ रुग्ण: दंडात्मक कारवाईचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहारात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून १ ते १३ जुलै दरम्यान ८५डेग्यू रुग्ण आढळून आले आहे. यामुळे धोका वाढला आहे.
महापालिकेच्या मलेरिया, फायलेरिया विभागाच्या कर्मचाऱ्यांद्वारे करण्यात येणाऱ्या गृह सर्वेक्षणामध्ये एखाद्या घरामध्ये वारंवार केलेल्या सर्वेक्षणात डेंग्यूची अळी (लारवा) कायम दिसून आल्यास संबंधित घरमालकावर दंडात्मक कारवाई करा, तसेच ज्या घराच्या बेसमेंटमध्ये पाणी साचत आहे आणि त्याच्यातून डासोत्पत्ती होत असल्यास अशा मालकांवर कारवाई करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी आढावा बैठकीत दिले.
प्रत्येक झोनमध्ये फॉगिंग मशीनची संख्या वाढवावी. रिकाम्या भूखंडामध्ये डासोत्पत्ती होते. अशा ठिकाणी औषध फवारणी करून संबंधित भूखंड मालकावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी व भूखंडातील कचरा साफ करून डासोत्पत्ती होणार नाही, याची काळजी घ्यावी, झोनमधील मलेरिया, फायलेरिया कर्मचाऱ्यांद्वारे झोनमध्ये करण्यात येणारे दैनंदिन सर्वे, त्यात लारवात आढळणारी घरे, डेंग्यू संशयित व पॉझिटिव्ह रुग्ण, डासोत्पत्ती केंद्र शोधणे व त्यात आवश्यक उपाययोजना करणे आदींबाबत दैनंदिन माहितीचा अहवाल दररोज तपासून कर्मचाऱ्यांच्या कार्याचा पाठपुरावा घेत राहण्याचे निर्देश महापौरांनी दिले. बैठकीला आरोग्य विभागाचे अधिकारी, झोन अधिकारी व मलेरिया, फायलेरिया निरीक्षक उपस्थित होते.
....
शहरात १.४३ ठिकाणी डासोत्पत्ती
शहरात १ जुलै ते १३ जुलैपर्यंत डेंग्यूचे ८५ रुग्ण मिळाले आहे. कर्मचाऱ्यांनी सर्व झोन मिळून जून महिन्यात ६६,९०३ घरांची तपासणी केली. याच्यातून एकूण १,५७१ घरांमध्ये डेंग्यूची अळी मिळाली. विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कूलर, टीन कंटेनर, कुंडी, नांद, सीमेंट टाके, प्लास्टिक भांडे, मातीची भांडी, टायर व फूलदाणीची तपासणी केली. मनपा कर्मचाऱ्यांना तपासणी दरम्यान सर्व झोन मिळून जूनमध्ये एकूण १,४३,०७९ डासोत्पत्ती स्थान मिळाले. यामधून ८५,४२८ डासोत्पत्ती स्थानावर कारवाई करण्यात आली आहे.
...
शहरातील डेंग्यू आजाराची स्थिती
झोनचे नाव रुग्णसंख्या (१ ते १३ जुलै)
लक्ष्मीनगर झोन १०
धरमपेठ १०
हनुमाननगर १३
धंतोली ०६
नेहरूनगर १३
गांधीबाग ०४
सतरंजीपुरा १५
लक डगंज ०५
आशीनगर ०४
मंगळवारी ०२
-----------------------------------