नागपुरात डेंग्यूचा धोका वाढला, दोन दिवसात ७९४ ठिकाणी आढळली अळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 09:24 PM2021-07-29T21:24:43+5:302021-07-29T21:25:11+5:30

Risk of dengue increased नागपुरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली आहे. मनपाद्वारे डेंग्यू प्रतिबंधाकरिता मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे विशेष मोहीम राबवून शहरात सर्वेक्षण सुरू आहे.

The risk of dengue increased in Nagpur, larvae were found in 794 places in two days | नागपुरात डेंग्यूचा धोका वाढला, दोन दिवसात ७९४ ठिकाणी आढळली अळी

नागपुरात डेंग्यूचा धोका वाढला, दोन दिवसात ७९४ ठिकाणी आढळली अळी

Next
ठळक मुद्दे१६,०२१ घरांचे सर्वेक्षण: तापाचे २०१ रुग्ण आढळले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपुरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली आहे. मनपाद्वारे डेंग्यू प्रतिबंधाकरिता मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे विशेष मोहीम राबवून शहरात सर्वेक्षण सुरू आहे. दोन दिवसात १६०२१ घरांची तपासणी करण्यात आली. यात ७९४ घरांमध्ये डेंग्यूची अळी आढळली. यामुळे डेंग्यूचा धोका वाढला आहे.

मंगळवारी ८०४२ घरांची तपासणी केली. यापैकी ३७८ घरांमध्ये डेंग्यूची अळी आढळली. तर बुधवारी ७९७९ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले त्यात ४१६ घरात अळी आढळून आली. सर्वेक्षणामध्ये मंगळवारी तापाचे ९६ रूग्ण आढळून आले तर बुधवारी १०३ रुग्ण आढळून आले. २५० जणांच्या रक्ताचे नमूने तर १३ जणांचे रक्तजल नमूने घेण्यात आले आहेत. बुधवारी सर्वेक्षणादरम्यान ३०२९ घरांमधील कुलर्सची तपासणी करण्यात आली. त्यात ३८१ कुलर्समध्ये डासअळी आढळून आली. मनपाच्या चमूद्वारे २९४ कुलर्स रिकामी करण्यात आले तर ९७७ कुलर्समध्ये १ टक्के तर १५५२ कुलर्समध्ये २ टक्के टेमिफॉस सोल्यूशन टाकण्यात आले. २०६ कुलर्समध्ये गप्पी मासे सुद्धा टाकण्यात आले.

गुरूवारी सतरंजीपूरा झोन येथे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी आणि अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी उपाययोजनेचा आढावा घेतला. आयुक्तांनी जास्तीत -जास्त नागरिकांच्या घराचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले.

लक्ष्मीनगर झोनमध्ये आरोग्य समिती सभापती महेश महाजन, झोन सभापती पल्लवी शामकुळे, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांनी उपाययोजनांचा आढावा घेतला. नेहरूनगर झोनमध्ये विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, झोन सभापती स्नेहल बिहारे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्याद्वारे आढावा घेण्यात आला. लकडगंज झोनमध्ये झोनसभापती मनीषा अतकरे यांनी सहायक आयुक्त साधना पाटील यांच्यासमवेत डेंग्यू रुग्ण आढळलेल्या परिसराला भेट देउन पाहणी केली व उपाययोजनांचा आढावा घेतला.

पावसामुळे डासांची पैदास वाढली

पावसामुळे डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे डासोत्पत्ती होणार नाही याचीही प्रत्येकाने विशेष काळजी घेण्याची गरज आहे. घरातील कुंड्या, कुलरची टाकी, भांडी व जिथे पाणी साचू शकते अशा ठिकाणी पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. याशिवाय ताप, उलट्या, सांधेदुखी, त्वचेवर पुरळ ही व अशी अन्य डेंग्यू सदृश्य लक्षणे दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांकडे जाउन उपचार घ्यावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभाने केले आहे.

Web Title: The risk of dengue increased in Nagpur, larvae were found in 794 places in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.