Corona Virus in Nagpur; वापरलेल्या मास्कपासून संसर्गाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 12:16 PM2020-04-08T12:16:10+5:302020-04-08T12:23:24+5:30

मास्क वापरल्यानंतर लाखो विषाणू व जीवाणू युक्त झालेल्या मास्कची सुरक्षित विल्हेवाट न लावल्यास संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

The risk of infection from the mask used | Corona Virus in Nagpur; वापरलेल्या मास्कपासून संसर्गाचा धोका

Corona Virus in Nagpur; वापरलेल्या मास्कपासून संसर्गाचा धोका

Next
ठळक मुद्देप्रशासनासोबतच नागरिकांचीही जबाबदारीसुरक्षित विल्हेवाट लावण्याची गरज-सर्वात सुरक्षित पद्धत म्हणजे वापरलेले मास्क सुरक्षितरीत्या जाळावे.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा वाढता धोका लक्षात घेता प्रत्येकजण मास्क वापरायला लागला आहे. परंतु मास्क वापरल्यानंतर लाखो विषाणू व जीवाणू युक्त झालेल्या मास्कची सुरक्षित विल्हेवाट न लावल्यास संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे बाजारात मिळेल ते मास्क वापरत आहेत. मात्र बायोमेडिकल वेस्ट तज्ज्ञांच्या मते, वापरलेल्या मास्कची सुरक्षित विल्हेवाट लावण्याची गरज आहे. असे न केल्यास संसर्गाची नवीन समस्या निर्माण होण्याचा धोका आहे. याचे गांभीर्य ओळखून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वापरलेल्या मास्कची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याचे आवाहन केले आहे. तज्ज्ज्ञांच्या मते, रुग्णालयात रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका आणि मेडिकल स्टाफला या मास्कची जास्त गरज असते. रुग्णालयातून निघणाऱ्या बायो मेडिकल वेस्टची विल्हेवाट लावायची स्वतंत्र यंत्रणा आहे. त्याचे काही नियम आहेत. मात्र शहरात आज जवळपास सर्वच लोक मास्क लावलेले दिसतात. मात्र, लाखोंच्या संख्येने वापरल्या जाणाºया या मास्कची विल्हेवाट कशी लावायची, याकडे कोणाचेही लक्ष नाही. सध्या बहुसंख्य नागरिक मास्क वापरत असल्याने घराघरात बायो मेडिकल वेस्ट निघू लागला आहे. त्यामुळे स्वत:ची सुरक्षा म्हणून जे लोक मास्क वापरतायेत. इतरांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी वापरलेल्या मास्कची योग्य विल्हेवाट लावावी, अशी त्यांची जबाबदारी वाढलेली आहे. तज्ज्ज्ञांच्या मते, वापरलेले मास्क थेट घरातल्या डस्टबिनमध्ये टाकून मोकळे होता येणार नाही. योग्यपद्धतीने विल्हेवाट लावण्याची गरज आहे.

-मास्कची सुरक्षित विल्हेवाट लावण्याची पद्धत
वापरलेल्या मास्कला पाण्यात ५ टक्के ब्लिचिंग पावडर मिसळून तयार केलेल्या द्रवात ५ ते १० मिनिटे निर्जंतुक करा. मग कागदात गुंडाळून डस्टबिन मध्ये टाका.

- एक टक्का सोडियम हायपोक्लोराइट आणि पाण्याचे द्रावण वापरून त्यात मास्क निर्जंर्तुक करून मग कागदात गुंडाळून डस्टबिनमध्ये टाका.
-जर घराजवळ तुमच्या मालकीची मोकळी जागा असेल तर त्यात खोल खड्डा करून त्यात मास्क जमिनीत गाडून टाकावे.

.........कचरा संकलन करणाऱ्यांनाही धोका
थुंकीतून लाखो विषाणू किंवा जिवाणू मास्कच्या आतील बाजूस राहू शकतात. वापरलेले मास्क तसेच घरगुती कचºयात टाकले तर त्यामुळे घरापासून डम्पिंग यार्डपर्यंत तो कचरा हाताळणारे अनेक लोकं संक्रमित होण्याचा धोका वाढतो.
 

 

Web Title: The risk of infection from the mask used

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.