रोबोटिक ‘नी रिप्लेसमेंट’साठी ‘आरएनएच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:06 AM2021-07-15T04:06:32+5:302021-07-15T04:06:32+5:30
- फोटो : डॉ. दिलीप राठी, डॉ. मुकेश लढ्ढा - रोबोटिक नी रिप्लेसमेंट करणारे मध्यभारतातील पहिले हॉस्पिटल - ऑपरेशनमध्ये ...
- फोटो : डॉ. दिलीप राठी, डॉ. मुकेश लढ्ढा
- रोबोटिक नी रिप्लेसमेंट करणारे मध्यभारतातील पहिले हॉस्पिटल
- ऑपरेशनमध्ये अचूकता, रुग्ण लवकर बरा होतो
नागपूर : गुडघ्याची वाटी बदलणे अर्थात ‘नी रिप्लेसमेंट’साठी (गुडघा प्रत्यारोपण) अचूकता महत्त्वाची आहे. व्यवस्थित आकाराचे सांधे, वाटी बदलून ते नीट बसवले गेले तर शस्त्रक्रिया यशस्वी होते, असे अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे. या शस्त्रक्रियेत कॉम्प्युटरचा वापर सुरू झालेला आहे. रोबोटिक सिस्टीमच्या वापरामुळे ऑपरेशन आधी कॉम्प्युटरवर त्याची रचना कशी असेल हे दिसून येते. या पद्धतीमुळे ऑपरेशनमध्ये अचूकता आली असून, ते १०० टक्के यशस्वी होण्याची आणि रुग्ण लवकर बरा होण्याची शक्यता वाढलेली आहे.
‘रोबोटिक नी ऑपरेशन’ ४०, बलराज मार्ग, धंतोली येथील नामांकित आरएनएच हॉस्पिटलमध्ये यशस्वीरीत्या करण्यात येते. वर्ष २००६ मध्ये स्थापन झालेल्या ३० बेडेड या हॉस्पिटलचे संचालक व आर्थोपेडिक सर्जन अॅण्ड ट्रामा स्पेशालिस्ट डॉ. दिलीप राठी आणि जॉईंट रिप्लेसमेंट अॅण्ड आर्थ्रोस्कोपी सर्जन डॉ. मुकेश लढ्ढा रुग्णांना सेवा देत आहेत. हॉस्पिटलमध्ये रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर, आर्थोस्कोपी, स्पोर्ट मेडिसीन सेंटर, फ्रॅक्चर, अॅक्सिडेंट व ट्रामा सर्जरी, स्पाईन सर्जरी, क्रिटिकल केअर सेंटर व व्हेंटिलेटर मल्टीपॅरा मॉनिटरने सुसज्ज, प्लास्टिक सर्जरी व कॉस्मेटिक सर्जरी, न्यूरोसर्जरी, युरोसर्जरी आदी सेवा उपलब्ध असून रुग्णांना २४ बाय ७ सेवा दिली जाते. रोबोटिक नी रिप्लेसमेंट करणारे मध्यभारतातील पहिले हॉस्पिटल आहे.
डॉ. दिलीप राठी आर्थोपेडियाक अॅण्ड ट्रामा सर्जन म्हणून गेल्या २० वर्षांपासून कार्यरत असून सर्व प्रकारच्या फ्रॅक्चर शस्त्रक्रियेत ते तज्ज्ञ आहेत. जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून नावलौकिक आहे. डॉ. मुकेश लढ्ढा हे आर्थ्रोस्कोपी क्षेत्रात स्पेशालिस्ट असून आरएनएचमध्ये वर्ष २०१० पासून जॉईंट रिप्लेसमेंट आणि स्पोर्ट मेडिसीनमध्ये कार्यरत आहेत. तसेच रोबोटिक असिस्टेड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी करणारे मध्य भारतातील एकमेव सर्जन आहेत.
डॉ. दिलीप राठी म्हणाले, डॉक्टर.. माझा गुडघा खूप दुखतोय..तुम्ही माझी ‘नी रिप्लेसमेंट’ करून टाका! म्हणजे पुन्हा कटकट नको! अशा तक्रारी घेऊन अनेक रुग्ण आमच्याकडे येतात. गुडघ्याच्या जुनाट दुखण्यावर नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करून कृत्रिम गुडघा बसविता येतो, हे आता सर्वांनाच माहीत आहे. पण नी रिप्लेसमेंट हा गुडघेदुखीवरचा एकमेव उपाय निश्चितच नाही. तो अंतिम उपाय आहे. शस्त्रक्रिया करताना गुडघेदुखीची तीव्रता आणि ते दुखणे किती जुने आहे, या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक असते. अखेर शस्त्रक्रियेचा पर्याय तपासून पाहिला जातो. कृत्रिम गुडघारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यावर दोन-तीन दिवसात रुग्ण चालू शकतो. त्याला टप्प्याटप्प्याने फिजिओथेरपीचे व्यायामही सांगितले जातात. या शस्त्रक्रियेनंतर चालणे-फिरणे, वाहन चालवणे, जिने चढणे-उतरणे, मांडी घालून बसणे या हालचाली करताना व्यक्तीला काहीही अडचण येत नाही. रुग्ण वयस्कर असेल तर त्याला मैदानी खेळ खेळण्याची अपेक्षाही नसते. पण दुखण्यामुळे जे रुग्ण चालूही शकत नाही त्यांचे रोजचे जीवन नक्कीच सुकर होते. पूर्वीच्या तुलनेत आता दोन्ही गुडघे बदलण्याची आवश्यकता असेल तर ते एकदमच बदलण्याचे काही फायदे असल्याचे दिसून आले आहे. जंतूसंसर्गाचा धोका कमी होणे, शस्त्रक्रियेत होणारे काही विशिष्ट खर्च कमी होणे, असे हे फायदे आहेत.
डॉ. मुकेश लढ्ढा म्हणाले, रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी अत्याधुनिक पद्धत आहे. या सर्जरीचे अनेक फायदे आहेत. कृत्रिम गुडघा अचूकपणे बसतो. रक्त कमी वाहते आणि मसल्स डॅमेज होत नाहीत. वेळ पूर्वीच्या सर्जरीएवढाच लागतो. सर्जरीनंतर दुखणे फिजिओथेरपीने कमी होते. रुग्ण वेगाने पूर्वस्थितीत येतो. पूर्वीच्या आणि रोबोटिक सर्जरीत कॉस्टचा काहीही फरक नाही. ही सर्जरी सामान्यांना परवडणारी आहे. सर्जरीसाठी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक व महागडी मशीन आहे. आतापर्यंत अनेक सर्जरी केल्या आहेत. पण या सर्जरीच्या मान्यतेसाठी पूर्वी ६३ रुग्णांवर सर्जरी करून अभ्यास केला. त्यामुळे दोन्ही पायांमध्ये काहीही फरक येत नाही. या सर्जरीत शून्य ते १.२ डिग्रीपर्यंत व्हेरिएशन येते. पण ६ डिग्रीपर्यंत व्हेरिएशन चालते, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. अलायमेंटच्या बाबतीत हॉस्पिटलने आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळविली आहे. डॉ. लढ्ढा म्हणाले, संधिवात आणि गठियावात वाढल्याने अशा रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक वर्षांपासून गुडघ्याच्या आजाराने न चाललेले किंवा पायाला वाक आलेले रुग्ण रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरीने सुरळीत चालायला लागले आहेत. त्यामुळे परंपरागत सर्जरीपेक्षा रुग्ण रोबोटिक सर्जरीकडे वळले आहेत.
रोबोनॅव्हिगेशन सिस्टीमचा उपयोग गुडघा प्रत्यारोपणासाठी (नी रिप्लेसमेंट) केला जातो. यामध्ये पायाच्या हाडांना जादा छिद्र पाडायची गरज पडत नाही. कॉम्प्युटर नेव्हिगेशनमुळे ऑपरेशन अचूक होते आणि रुग्ण लवकर बरा होतो. ऑपरेशननंतर चार तासानंतर रुग्ण पायावर उभा राहून चालू शकतो. त्यामुळे गुडघावाटी प्रत्यारोपण ही रुग्णासाठी मोठी बाब राहिलेली नाही. तसेच फार काळ त्याला रुग्णालयामध्ये पडून राहण्याची गरजही उरत नाही. स्टीचलेस व पीनलेस सर्जरी, जनरल अॅनेस्थेशिया देण्याची गरज नाही आणि हाडांचा योग्य वापर करून अचूकपणे नवीन गुडघा वाटी बसवता येते.
डॉ. दिलीप राठी म्हणाले, वाढलेले वजन आणि व्यायामाचा अभाव सांधेदुखीला कारणीभूत ठरतात. त्यामुळे चालताना, व्यायाम करताना गुडघ्याची काळजी घेणे आवश्यक आहे. डायट आणि वजन नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे. याशिवाय बदलत्या जीवनशैलीत गुडघ्याची काळजी महत्त्वाची ठरते. गुडघा फ्रॅक्चर झाल्यास वा दुखणे वाढल्यास रुग्णाला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार करणे आवश्यक आहे. या सर्वांमध्ये व्यायाम महत्त्वाचा ठरतो. वजन आटोक्यात राहणे हा व्यायामाचा अप्रत्यक्ष फायदा असतो.
(आरसीआय)