एम्सपर्यंत २ कि़मी.चा रस्ता
By admin | Published: July 22, 2016 02:56 AM2016-07-22T02:56:28+5:302016-07-22T02:56:28+5:30
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांनी गुरुवारी
विश्वास पाटील यांचा आढावा : एचसीएल काम सुरू करणार
नागपूर : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांनी गुरुवारी मिहानमध्ये सध्या सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. मिहानमध्ये एम्सला जागेचा ताबा देण्यात आला असून त्यापर्यंत पोहोचण्यासाठी २ कि़मी.चा रस्ता बांधण्यात येणार आहे. तसेच एचसीएल बांधकाम सुरू करीत असल्याचे पाटील यांनी लोकमतला सांगितले.
विश्वास पाटील यांनी बुधवार आणि गुरुवारी एमएडीसी आणि मिहान इंडिया लिमिटेडच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मिहानमध्ये सुरू असलेल्या कंपन्यांच्या विकास कामांची माहिती घेतली. नागपूर विमानतळ तसेच मिहान प्रकल्पातील लोकांचे पुनर्वसन, ऊर्जा, रस्त्यांचे नेटवर्क, इंटरनेट, टेलिकम्युनिकेशन आदींसह सर्व विकास कामांचा आढावा घेतला. (प्रतिनिधी)
एमआयएलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा
मिहान इंडिया लिमिटेडचे (एमआयएल) मुख्य कार्यकारी संचालक असलेले विश्वास पाटील यांनी गुरुवार, २१ जुलैला कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि विकास कामांचा आढावा घेतला. या बैठकीत वरिष्ठ विमानतळ संचालक व्ही.एस. मुळे, महाव्यवस्थापक आबीद रुही, कंपनी सचिव नवीन बक्षी, वरिष्ठ व्यवस्थापक (विमानतळ सुरक्षा व कार्यान्वयन) लक्ष्मीनारायण भट, वरिष्ठ व्यवस्थापक (अभियांत्रिकी व व्यावसायिक) सूरज शिंदे, वरिष्ठ व्यवस्थापक (सिव्हिल व टर्मिनल) अमित कासटवार, सल्लागार (फायर) डी.एम. तरटे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
अधिकाऱ्यांना निर्देश
मिहानमध्ये अनेक कंपन्या बांधकाम करीत आहेत. त्यांनी प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बैठकीत मुख्य अभियंते एस.के. चॅटर्जी, अधीक्षक अभियंता रजनी लोणारे, उपजिल्हाधिकारी अशोक चौधरी, वरिष्ठ आर्किटेक्ट सी. बनकर, विपणन अधिकारी अतुल ठाकरे, जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी, ऊर्जा सल्लागार के.आर. इंगोले, पाणी पुरवठा सल्लागार बी.आर. तिवारी, पुनर्वसन सल्लागार बलवंत मोहरील, सुरक्षा अधिकारी गजानन येमपल्लीवार उपस्थित होते.