रस्त्यातील नालीचे स्लॅब तुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:09 AM2021-05-14T04:09:02+5:302021-05-14T04:09:02+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : शहरातील खडगाव रस्त्यावर दाेन महिन्यांपूर्वी नालीचे बांधकाम करण्यात आले. परंतु अल्पावधीतच नालीचे स्लॅब तुटल्याने ...

The road drain slab is broken | रस्त्यातील नालीचे स्लॅब तुटले

रस्त्यातील नालीचे स्लॅब तुटले

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

वाडी : शहरातील खडगाव रस्त्यावर दाेन महिन्यांपूर्वी नालीचे बांधकाम करण्यात आले. परंतु अल्पावधीतच नालीचे स्लॅब तुटल्याने वाहतुकीला अडसर ठरत आहे. या नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असून, संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.

वाडी शहरातील गाेदाम असलेल्या भागात मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याने ट्रान्सपाेर्ट व गाेदाम मालकांमध्ये नाराजीचा सूर आळवला जात आहे. काही वाॅर्डांचा परिसर साेडल्यास कंट्राेल वाडी, शाहू ले-आऊट, कोहळे ले-आऊट, आदर्शनगर, माउलीनगर, विकासनगर, खडगाव रोड तसेच वर्मा ले-आऊट या भागात मोठ्या प्रमाणात गोदाम असल्याने सतत वर्दळ असते. या भागात मूलभूत सुविधा देण्याकडे नगर परिषद प्रशासन व लाेकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे विविध समस्यांनी तोंड वर काढले आहे.

खडगाव मार्गावर नालीचे स्लॅब तुटल्याने या भागातील ट्रान्सपाेर्ट व्यावसायिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: दाेन महिन्यांपूर्वी सांडपाण्याच्या नालीचे बांधकाम करण्यात आले. अल्पावधीतच नाली तुटल्याने वाहनचालकांना आपली वाहने त्या भागात नेणे शक्य हाेत नाही. शिवाय, नाली तुटल्याने या ठिकाणी अपघाताची शक्यता बळावली आहे. लाॅकडाऊनमुळे सर्व व्यवसाय ठप्प पडले आहेत. त्यात नाली तुटल्याने ट्रान्सपाेर्ट व्यावसायिकांच्या समस्येत भर पडली आहे. या नालीची तातडीने दुरुस्ती करावी तसेच निकृष्ट बांधकाम करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ट्रान्सपाेर्ट व्यावसायिकांनी न. प. मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या वेळी राेशन धावडे, सुभाष माने, सतीश चौधरी, अमोल लोटेकर, सुनील यादव, जगदेव राणा उपस्थित होते.

Web Title: The road drain slab is broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.