शेतात जाणारा पांदण रस्ता केला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:08 AM2021-05-18T04:08:56+5:302021-05-18T04:08:56+5:30
भिवापूर : शेतात जाणारा पांदण रस्ता लगतच्या एका शेतकऱ्याने काठ्या टाकून बंद केला. यामुळे शेतकऱ्याला शेतीची वाहीजुपी करणे कठीण ...
भिवापूर : शेतात जाणारा पांदण रस्ता लगतच्या एका शेतकऱ्याने काठ्या टाकून बंद केला. यामुळे शेतकऱ्याला शेतीची वाहीजुपी करणे कठीण झाले आहे. रस्ताच बंद केल्यामुळे शेतात जायचे तरी कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यासमाेर उभा ठाकला आहे. याबाबत शेतकऱ्याने प्रभारी तहसीलदार दिनेश पवार यांच्याकडे दाद मागितली असून, शेतीचा पांदण रस्ता माेकळा करून देण्याची मागणी केली आहे.
प्रमाेद पंचम माेटघरे यांची भिवापूरनजीकच्या परसाेडी शिवारात तलाठी साझा क्र. ७८, गट क्रमांक २२/१ ही वडिलाेपार्जित शेती आहे. या शेतीत जाण्यासाठी शासकीय पांदण रस्ता आहे. लगतच्या शेतमालकाने आपली शेतजमीन अन्य एका शेतकऱ्यास भाडेतत्त्वावर वाहीजुपीसाठी दिली आहे. या भाडेकरू शेतकऱ्याने १५ मे राेजी रात्रीच्या सुमारास पांदण रस्त्यावर काठ्या व बाभळीच्या फांद्या टाकून वहीवाटीचा रस्ता बंद केला. त्यामुळे शेतकरी प्रमाेद माेटघरे यांच्यासमाेर शेतीच्या वहीवाटीचा माेठा प्रश्न उभा ठाकला आहे. शेतीचा हंगाम ताेंडावर असताना पांदण रस्ता बंद केल्यामुळे वाहीजुपी करायची कशी, असा प्रश्न उपस्थित करीत, प्रमाेद माेटघरे यांनी रस्ता माेकळा करून देण्याबाबत तहसीलदारांकडे दाद मागितली आहे.
===Photopath===
170521\img-20210517-wa0082.jpg
===Caption===
पांदण रस्त्यावर बाभळीच्या काठ्या टाकुन वहिवाट अशी बंद केली आहे.