श्रमदानातून केली रस्त्याची दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:18 AM2021-09-02T04:18:19+5:302021-09-02T04:18:19+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : शहरालगतच्या कन्हान नदीकडे जाणाऱ्या रस्त्याची गेल्या वर्षभरापासून अतिशय दुर्दशा झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत या ...

Road repairs done through labor | श्रमदानातून केली रस्त्याची दुरुस्ती

श्रमदानातून केली रस्त्याची दुरुस्ती

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापा : शहरालगतच्या कन्हान नदीकडे जाणाऱ्या रस्त्याची गेल्या वर्षभरापासून अतिशय दुर्दशा झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत या रस्त्याने पायी चालणेसुद्धा कठीण झाले हाेते. असे असताना नगरपालिका प्रशासन मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे कानाडाेळाच करीत हाेते. अखेर शहरातील टायगर ग्रुपच्या तरुणांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घेतला. तरुणांनी श्रमदान करीत रस्त्याची दुरुस्ती आणि साफसफाई करून हा रस्ता रहदारीयाेग्य केला. तरुणांच्या या उपक्रमाचे अनेकांनी काैतुक केले.

खापा शहरातील कन्हान नदीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने रहदारीसाठी अडसर हाेता. विशेषत: कन्हान नदीपात्रात कान्हाेबा, गाैरी, गणपती विसर्जन करण्यासाठी जाणे कठीण झाले हाेते. ही बाब लक्षात घेत टायगर ग्रुपचे शाखाप्रमुख संदीप गिरीपुंजे व सहकारी तरुणांनी श्रमदान करीत संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती केली. साफसफाई करून रस्त्यावरील पथदिवेसुद्धा लावले. हा रस्ता रहदारीयाेग्य झाल्याने महिला व नागरिकांना माेठा दिलासा मिळाला आहे. यावेळी शाखाप्रमुख संदीप गिरीपुंजे, आशिष ढाले, अमाेल लांबट, आकाश हिवरकर, कुणाल हिवरकर, अक्षय लांबट, अंकित हिवरकर, माेनिष पावडे, राहुल लांबट, प्रतीक हिवरकर, धीरज हिवरकर, कमलेश पलांदूरकर, वैभव लांबट, आदींनी श्रमदान केले.

010921\img-20210831-wa0121.jpg

खापा येथे श्रमदानातून रस्ताची डागडुजी

Web Title: Road repairs done through labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.