स्मार्ट सिटीत चिखलातून शोधावा लागतो रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:12 AM2021-09-08T04:12:03+5:302021-09-08T04:12:03+5:30
पावसामुळे रस्त्यांची चाळण : जागोजागी खड्डे व घाण पाणी साचून लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्मार्ट सिटीचा मोठा ...
पावसामुळे रस्त्यांची चाळण : जागोजागी खड्डे व घाण पाणी साचून
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मार्ट सिटीचा मोठा गाजावाजा सुरू आहे. राजकीय नेते याचे श्रेय घेण्याचा खटाटोप करताहेत. प्रत्यक्षात मात्र स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश असलेल्या भरतवाडा, पूनापूर, पारडी व भांडेवाडी परिसरातील नागरिकांना चिखलातून रस्ता शोधावा लागतो. पावसाळ्यात तर मरणयातना सोसाव्या लागत आहेत.
स्मार्ट सिटीत समावेश असलेल्या भागात ५२ किलोमीटरचे ५५ रस्ते निर्माण केले जाणार आहेत. यातील ४० रस्त्यांचे काम सुरू असल्याचा दावा स्मार्ट सिटीकडून केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र प्रमुख सिमेंट रोडचे काम दीड वर्षापासून ठप्प आहे. प्रभाग ४ मधील न्यू भरतनगर, जामनगर, धर्मनगर, कन्यानगर, शिवशंभूनगर, मानसी ले-आऊट परिसरातील वस्त्यांतील रस्त्यांवर चिखल साचला आहे. भरतवाडा ते जामनगर रस्म्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अन्य रस्त्यांचीही अशीच बिकट अवस्था आहे.
स्मार्ट सिटीत समावेश असल्याने या भागातील वस्त्यांना महापालिका वा नासुप्रने वाऱ्यावर सोडले आहे. रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी निधी दिला जात नाही. नागरिक त्रस्त असून आरोग्य धोक्यात आले आहे.
....जोड आहे....