रस्ते ना नाल्या सर्वत्र घाण पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:11 AM2021-09-05T04:11:54+5:302021-09-05T04:11:54+5:30
स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश असलेल्या भरतवाडा, पुनापूर, पारडी भागात अंतर्गत पक्के रस्ते नाही. पावसाळी नाल्या, सिवरेज लाईन ...
स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश असलेल्या भरतवाडा, पुनापूर, पारडी भागात अंतर्गत पक्के रस्ते नाही. पावसाळी नाल्या, सिवरेज लाईन नसल्याने जागोजागी घाण पाणी साचून आहे. पावसात चिखल होत असल्याने नवीननगर परिसरातील रस्त्यावर गिट्टी टाकण्यात आली आहे. पाणी वाहून जाण्यासाठी नवीननगर भागात नाली खोदकाम सुरू असून, चिखलामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
....
असा आहे क्षेत्राधिष्ठित विकास प्रकल्प
पारडी-भरतवाडा-पुनापूर-भांडेवाडी परिसराचा समावेश
या भागातील लोकसंख्या -१,१५,०००
घरांची संख्या -२३,०००
प्रस्तावित खर्च -८७६ कोटी
प्रोजेक्ट टेंडरशुअर प्रकल्प - ६५० कोटी
होम स्वीट होम प्रोजेक्ट -२२२.०९ कोटी
....
या सुविधा कागदावरच
४ बाय ७ पाणीपुरवठा
रस्ते -५२ किलोमीटर
पार्क, उद्याने, क्रीडांगणे-१०४
शाळा -१०
लायब्ररी -३
स्कील डेव्हलपमेंट -१
डिस्पेन्सरी -७
मॅटर्निटी होम -४
हॉस्पिटल -१
मार्केट -३
पोलीस स्टेशन, फायर स्टेशन-१
बस चार्जिंग स्टेशन -१
पुलांचे निर्माण -२९
टाऊन हॉल -१
हाऊसिंग -३५
एलईडी पथदिवे -७ हजार
मलनिस्सारण प्रकल्प -१