नागपुरातील शंकरनगर, बर्डीवरचे रस्ते पडले ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 11:41 PM2020-03-21T23:41:14+5:302020-03-21T23:43:25+5:30

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊनचे आदेश काढल्यानंतर नागपूर शहरातील रस्ते ओस पडलेले दिसले. प्रशासनाने जाहीर केलेल्या यादीतील अत्यावश्यक सेवा वगळता बहुतेक सर्व दुकाने बंद होते.

Roads on Shankarnagar, Buldi in Nagpur become depopulated | नागपुरातील शंकरनगर, बर्डीवरचे रस्ते पडले ओस

नागपुरातील शंकरनगर, बर्डीवरचे रस्ते पडले ओस

Next
ठळक मुद्देदुपारनंतर ऑटो सेवा किरकोळ : गोकुळपेठ बाजाराला दिसली ग्राहकांची प्रतीक्षा

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊनचे आदेश काढल्यानंतर नागपूर शहरातील रस्ते ओस पडलेले दिसले. प्रशासनाने जाहीर केलेल्या यादीतील अत्यावश्यक सेवा वगळता बहुतेक सर्व दुकाने बंद होते. दुपारनंतर शहरातील ऑटो सेवाही किरकोळ दिसली. तर, गोकुळपेठच्या आठवडी बाजारात दुकानदारांना ग्राहकांची प्रतीक्षा दिसली. प्रशासनाच्या लॉकडाऊन घोषणेनंतर लोकमत प्रतिनिधीने शहरात फेरफटका मारला असता हे चित्र दिसले.


रामदासपेठ आणि धंतोली हा एरवी गजबजलेला परिसर असतो. या परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्णालये असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी असते. नाश्ता, चहा, हॉटेल्स, खानावळदेखील दिवसभर माणसांच्या गर्दीने फुललेल्या असतात. परंतु शनिवारी हा परिसर गर्दीविना जाणवला. एरवी गजबजलेल्या या परिसरातील गल्ल्या आज अगदी सुनसान जाणवत होत्या. रामदास पेठ परिसरातील एका हॉटेल जवळील गल्लीमध्ये असलेले एक-दोन झेरॉक्स सेंटर मात्र सुरू होते. या परिसरातील लाँड्रीची दुकानेही सुरू होती.

अलंकार टॉकीजचा परिसरदेखील प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देताना दिसला. येथील पेट्रोल पंपवर तुरळक गर्दी होती. पंपावरील कर्मचाऱ्यांच्या तोंडावर मास्क मात्र दिसले नाही. प्रशासनाच्या स्वच्छतेच्या आवाहनावंतरही शहरातील शंकरनगर परिसरातील चौकात फूटपाथवर मास्क विक्री दिसली. फेरीवाले अस्वच्छ हाताने मास्क विकत होते. या बाबीकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज जाणवली.
गोकुळपेठ परिसरात शनिवारी भाजीबाजार भरतो. नेहमीप्रमाणे भाजी विक्रेते, व्यापारी मोठ्या प्रमाणावर माल घेऊन आले होते. परिसवारतील बहुतेक किराणा दुकानाही सुरू दिसले. मात्र बाजारात म्हणावी तशी गर्दी नव्हती. विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा जाणवली.फुलांची विक्री करणारे एक दोन किरकोळ विक्रेतेसुद्धा या बाजारात दिसले. ग्राहकच नसल्याने आपल्या मालाचे काय होणार, अशी चिंता त्यांच्या चेहऱ्यावर जाणवली.
सीताबर्डी परिसर गजबजलेला परिसर असतो. मात्र या रोडवर मुलांनी मस्तपैकी क्रिकेटचा खेळ मांडला होता. मोदी नंबर दोन आणि सीताबर्डी येथील चौकातील गल्लीमध्ये लहान मुले क्रिकेटच्या खेळात रंगले होते.
वाहतुकीचे नियमन करण्यासाठी शहरातील चौकातील सिग्नल सतत सुरू असतात. मात्र गर्दीच नसल्याने सर्वच चौकांमध्ये सिग्नलविना वाहतूक सुरू होती. लॉक डाऊनमुळे नागरिक घराबाहेर पडत नसल्याने ऑटोचालकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम पडलेल्या जाणवला. सकाळी रस्त्यावर ऑटोंची बऱ्यापैकी संख्या होती. मात्र दुपारनंतर ही संख्या रोडावली. सीताबर्डी परिसर प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने चालकांसाठी महत्त्वाचा असतो. या ठिकाणीसुद्धा किरकोळ ऑटो चौकात उभे दिसले.

चौकातील स्पिकरवरून मुंढेंचे आवाहन
शहरातील सर्व चौकांमध्ये एरवी वाहतूक नियमांसंदर्भात स्पीकरवरून आवाहन होते असते. शनिवारी मात्र शहरातील सर्वच चौकांमध्ये याच स्पिकरवरून महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचे स्वच्छतेबाबत आवाहन चौका-चौकात ऐकू येत होते. यामुळे प्रशासनाकडून सुरू असलेल्या जनजागृतीमध्ये अधिक भर पडलेली जाणवली.

 

 

Web Title: Roads on Shankarnagar, Buldi in Nagpur become depopulated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.