उपराजधानीतील रस्त्यांची पावसाने केली पोलखोल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:12 AM2021-08-24T04:12:25+5:302021-08-24T04:12:25+5:30

नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या उपराजधानी नागपुरातील मार्गांचे पितळ पावसामुळे उघडे पडण्याची वेळ आली आहे. मार्गावरील खड्डे आणि ...

Roads in Uparajdhani flooded by rains! | उपराजधानीतील रस्त्यांची पावसाने केली पोलखोल !

उपराजधानीतील रस्त्यांची पावसाने केली पोलखोल !

Next

नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या उपराजधानी नागपुरातील मार्गांचे पितळ पावसामुळे उघडे पडण्याची वेळ आली आहे. मार्गावरील खड्डे आणि धक्के खात जाणारी वाहने ही आता सामान्य बाब झाली आहे. थातूरमातूर डागडुजी करून खड्डे भरण्याचे कामही निकृष्ट असल्याने पावसाने शहरातील रस्त्यांची पोलखोल केली आहे. फ्लायओव्हर, मेट्राे आणि आरयूबी आदींची कामे पूर्ण झाल्यावरही रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. वर्धा राेडवर अजनी ते एअरपाेर्टपर्यंतच्या डबलडेकर पुलाखालून जाणाऱ्या मार्गाची दुरवस्था हे उत्तम उदाहरण आहे. या मार्गाची दुरुस्ती न झाल्याने आणि खड्डे न भरल्याने धोका वाढला आहे. असाच प्रकार कामठी राेडवरील मंदगतीने काम सुरू असलेल्या डबलडेकर पुलाचा आहे. पारडीमध्ये मेट्राे आणि एनएचएआयच्या कामानंतर तिथेही रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही. मेट्राेचे बरेचसे साहित्य रस्त्यावरच ठेवलेले आहे.

हिंगणा मार्गावर थर उखडत असून, मार्गावर पसरलेली बारीक गिट्टी अपघाताला निमंत्रण देत आहे. ओसीडब्ल्यू व मनपाकडून काही ठिकाणी पाइपलाइनसाठी खोदलेले खड्डे बुजविलेले नाही. मानकापूर चाैक आणि आरयूबीजवळही चांगल्या मार्गांची दुर्दशा आहे. रिंगरोडचेही काम कासवगतीने सुरू आहे. आउटर रिंगराेडचे कामही अडले आहे. पाचपावली, मंगळवारी आणि जरीपटका आरओबीवर खड्डे पडले आहेत. शहरात रामदासपेठ, बैरामजी टाउन, राजनगर यासारख्या परिसरातही मार्गांची दुरवस्था आहे.

...

कोट

वर्धा राेडवर डबलडेकर पूल झाल्यावर खालील मार्गाच्या दुरुस्तीचे काम केले. त्यानंतरच हे रस्ते मनपाकडे हस्तांरित केले.

- अखिलेश हळवे, जनसंपर्क अधिकारी, महामेट्राे, नागपूर

...

कोट

वर्धा राेडवरील डबलडेकर पुलाखालील मार्गाचे संयुक्त निरीक्षण झाले नाही. काही प्रक्रियेनंतर रस्ते हस्तांतरित केले जातील. शहरातील अन्य मार्गांची दुरुस्ती पावसामुळे खोळंबली आहे. अधिक खराब झालेल्या मार्गांच्या दुरुस्तीसाठी रिनिव्हल प्लॅन आखला आहे.

- अजय पाेहेकर, अधीक्षक अभियंता, मनपा

...

कोट

शहरातील अंतर्गत भागातील कामानंतर रस्ते मनपाकडे हस्तांतरित केले आहेत. पारडीमध्ये रस्ता रुंदीकरणासाठी जागा मिळाल्याने ७ मीटरऐवजी ११ मीटर रुंदीकरण केले आहे.

- राजीव अग्रवाल, क्षेत्रीय अधिकारी, एनएचएआय, नागपूर

...

Web Title: Roads in Uparajdhani flooded by rains!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.