लुटारू पाेलिसांच्या जाळ्यात : रायफलसह कार जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 11:35 PM2021-01-07T23:35:53+5:302021-01-07T23:37:14+5:30
Robber arrested, crime news चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा पाेलीस ठाण्याच्या हद्दीत लूटमार करून नागपूर, देवलापारमार्गे मध्य प्रदेशात पळून जाणाऱ्या तीन लुटारूंना देवलापार पाेलिसांनी नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मानेगाव टेक शिवारात नाकाबंदी करून अटक केली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार/हिवरा बाजार : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा पाेलीस ठाण्याच्या हद्दीत लूटमार करून नागपूर, देवलापारमार्गे मध्य प्रदेशात पळून जाणाऱ्या तीन लुटारूंना देवलापार पाेलिसांनी नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मानेगाव टेक शिवारात नाकाबंदी करून अटक केली. त्यांच्याकडून कार आणि १२ बाेरची रायफल जप्त केली. ही कारवाई बुधवारी (दि. ६) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
प्रदीप अजित सिंग (२४), जयप्रकाश विजेंद्र सिंग (२६) व सूरज रतवीर सिंग (२७) अशी अटक करण्यात आलेल्या लुटारूंची नावे असून ते हरियाणातील रहिवासी आहेत. लूटमारीच्या घटनेतीन तीन आराेपी नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गाने मध्य प्रदेशात पळून जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील पाेलीस अधिकाऱ्यांना मिळाली हाेती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या सूचनेवरून देवलापार (ता. रामटेक) पाेलिसांनी मध्य प्रदेशच्या सीमेवरील त्यांच्या हद्दीत येणाऱ्या मानेगाव टेक येथे नाकाबंदी केली.
समाेर पाेलिसांना पाहताच (एचआर-२६/बीजे-४८६०) क्रमांकाच्या कारने जात असलेल्या आराेपींनी दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाेलीस उपनिरीक्षक केशव पुंजरवाड यांनी त्यांच्यावर पिस्टल राेखून अडविले आणि कारची झडती घेतली. त्यांना कारच्या डॅशबाेर्डमध्ये लपवून ठेवलेली १२ बाेरची रायफल आढळून आली. तिन्ही आराेपी चंद्रपूर जिल्ह्यातून पळून आल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
...
राजुरा पाेलिसांच्या स्वाधीन
या तिघांनी राजुरा (जिल्हा चंद्रपूर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीत लूटमार केली आणि तिथून पळून ते मध्यप्रदेशच्या दिशेने निघाले हाेते. देवलापार पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून १२ बाेरची रायफल आणि कार जप्त केली. शिवाय, पुढील तपासासाठी तिघांनाही चंद्रपूर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या स्वाधीन केल्याची माहिती देवलापारचे ठाणेदार प्रवीण बाेरकुटे यांनी दिली. या कारवाईमुळे आराेपींकडून नजीकच्या काळात हाेणाऱ्या घटनांना प्रतिबंध लावला आहे.