चांपामधील दरोडा व बलात्कार प्रकरण : पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 11:52 PM2019-08-12T23:52:16+5:302019-08-12T23:53:30+5:30

सत्र न्यायालयाने कुहीजवळच्या चांपा येथील दरोडा व बलात्कार प्रकरणातील पाच आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी २६ हजार रुपये दंड, अशी कमाल शिक्षा सुनावली आहे.

Robbery and rape cases in Champa: Five accused sentenced to life imprisonment | चांपामधील दरोडा व बलात्कार प्रकरण : पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

चांपामधील दरोडा व बलात्कार प्रकरण : पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर सत्र न्यायालय

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : सत्र न्यायालयाने कुहीजवळच्या चांपा येथील दरोडा व बलात्कार प्रकरणातील पाच आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी २६ हजार रुपये दंड, अशी कमाल शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश विभा इंगळे यांनी हा निर्णय दिला.
आतिश भोसले (२६), शशिकपूर भोसले (२१), दिनेश राज चव्हाण (२२), गुलाबचंद भोसले (२३) व रवी भोसले (२८), अशी आरोपींची नावे असून, आतिश व शशिकपूर हे चांपा तर, अन्य आरोपी हरदा ( मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहेत. ही घटना १९ जानेवारी २०१३ रोजी घडली होती. आरोपींनी चांपा येथील शेतात राहणाऱ्या एका कुटुंबावर सशस्त्र हल्ला केला होता. दरम्यान, त्यांनी महिला, पुरुष व मुलामुलींना जबर मारहाण करून घरातील सामान लुटले. तसेच, १८ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी इतर घरांत दरोडा टाकून लोकांना जखमी केले होते. तक्रार दाखल झाल्यानंतर कुही पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून आरोपींना अटक केली होती. तसेच, तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. नितीन तेलगोटे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Robbery and rape cases in Champa: Five accused sentenced to life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.