अवैध वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:09 AM2021-03-24T04:09:39+5:302021-03-24T04:09:39+5:30

कैलास निघाेट लाेकमत न्यूज नेटवर्क देवलापार : काेराेना संक्रमणामुळे महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, देवलापार ...

Robbery of passengers by illegal transporters | अवैध वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट

अवैध वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट

Next

कैलास निघाेट

लाेकमत न्यूज नेटवर्क

देवलापार : काेराेना संक्रमणामुळे महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, देवलापार (ता. रामटेक) परिसरातून मध्य प्रदेशात खुलेआम प्रवाशांची अवैध वाहतूक केली जात आहे. अवैध प्रवासी वाहतूकदारांनी या बंदीचा फायदा घेत त्यांच्या तिकीट दरात भरमसाठ वाढ केल्याने सामान्य प्रवाशांची मात्र आर्थिक लूट केली जात आहे.

नागपूर शहरातून मध्य प्रदेशच्या जाणाऱ्या प्रत्येक बसमध्ये किमान ६० ते ६५ तर जीपमध्ये १८ ते २१ प्रवासी काेंबलेले असतात. प्रवासी वाहनात घेण्याची जबाबदारी वाहकावर असते. या प्रवाशांमध्ये कामगारांची संख्या अधिक असते. ते कामगार मध्य प्रदेशातील मूळ रहिवासी असून, या प्रकारात मध्य प्रदेश प्रशासन महाराष्ट्र प्रशासनाला दाेषी ठरवत बदनाम करण्याचा प्रयत्नही करते. नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्रात कांद्री-मनसर (ता. रामटेक) व मध्य प्रदेशातील मिटेवाणी येथे सीमा तपासणी नाका (आरटी चेकपाेस्ट) आहेत. ही प्रवासी वाहतूक पाेलीस व परिवहन विभागातील अधिकाऱ्यांना दिसत नाही काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित हाेताे. ही वाहतूक महाराष्ट्र व मध्य प्रदेश आरटीओ अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नागपूर-शिवनी अंतर १३० किमी असून, नागपूरहून शिवनीला जाण्यासाठी प्रत्येकी ६०० रुपये, नागपूर-मंडलसा १,३०० रुपये, नागपूर-रिवा १,८०० रुपये, नागपूर-नैनपूर १,२०० रुपये, नागपूर-लखनादैन १,३०० रुपये, नागपूर-देवलापार २०० रुपये असे प्रवासभाडे आकारले व वसूल केले जाते. या प्रवासभाड्यात चारपट वाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ अवैध असली तरी याकडे कुणाचेही लक्ष नाही. शिवाय, काेराेना प्रतिबंधक उपाययाेजना आणि वाहनातील प्रवाशांची संख्याही कुणी तपासून बघत नाही.

नागपूरहून (गांधीबाग) निघालेली ही प्रवासी वाहने नागपूर शहरातील गांधीबाग, इंदोरा, यशाेधरानगर, जिल्ह्यातील कामठी, कन्हान, महामार्ग ट्राफिक (आमडी), रामटेक व देवलापार या सात पाेलीस ठाण्यांची हद्द ओलांडून मध्य प्रदेशाच्या सीमेवर येते. हे अंतर ८० किमीचे असून, यासाठी एका बसला तब्बल सहा तास लागतात. सकाळी ८ वाजता निघालेली बस मानेगाव (टेक) शिवारात दुवारी २ वाजताच्या सुमारास पाेहाेचते. यात प्रवाशांचे प्रचंड हाल हाेत असून, वाहनांमधील गर्दी काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडते.

...

आंतरराज्यीय प्रवासाचा तिढा

नागपूर जिल्हा मध्य प्रदेशाच्या सीमावर्ती भागात असल्याने तसेच जिल्ह्यात काेराेना संक्रमण वाढत असल्याने नागपूर जिल्ह्यातून मध्य प्रदेशात येण्यास तेथील प्रशासनाने प्रतिबंध घातला आहे, अशी माहिती काही जाणकार व्यक्तींनी दिली. त्यामुळे आंतरराज्यीय प्रवासाचा तिढा निर्माण झाला आहे. नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मानेगाव (टेक) (ता. रामटेक) येथून मध्य प्रदेशची सीमा एक किमी अंतरावर सुरू हाेते. त्यामुळे महाराष्ट्रातील खासगी प्रवासी वाहतूकदार प्रवाशांना मानेगाव (टेक) शिवारातील धाब्यापर्यंत साेडतात. नंतर प्रवासी पायी सीमा पार करून पुढील प्रवासाला सुरुवात करतात.

...

उपाययाेजनांचा फज्जा

नागपूर शहरातून मानेगाव (टेक)पर्यंत येणाऱ्या खासगी बसेस व इतर प्रवासी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना आणले जाते. त्या वाहनांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. प्रवाशांनी मास्क वापरला आहे की नाही याची तपासणीही केली जात नाही. बहुतांश वाहनांमध्ये प्रवाशांना गुरांप्रमाणे काेंबून आणले जाते. मध्य प्रदेशच्या सीमेजवळ राेडच्या दाेन्ही बाजूला प्रत्येकी एक याप्रमाणे दाेन धाबे आहेत. यातील एक महाराष्ट्रात (रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीत) तर दुसरा मध्य प्रदेशात (कुरई पाेलीस ठाण्याच्या हद्दीत) आहे. हे दाेन्ही धाबे प्रवाशांचे बसस्थानक बनले असून, तिथे प्रवाशांची अदलाबदली केली जाते. खवासा (मध्य प्रदेश) हे सीमावर्ती भागातील पहिले गाव हाेय.

Web Title: Robbery of passengers by illegal transporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.