'द रॉक बाबाज अँड ऑदर स्टोरीज', लघुकथा : आशा-अपेक्षांचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 13:51 IST2021-02-22T13:48:41+5:302021-02-22T13:51:17+5:30
‘The Rock Babas and Other Stories’ : जीवनाने तुम्हाला लिंबू दिले असेल, तर त्यापासून लिंबूपाणी बनवा असा संदेत त्यातून मिळतो.

'द रॉक बाबाज अँड ऑदर स्टोरीज', लघुकथा : आशा-अपेक्षांचा प्रवास
- मेहा शर्मा
नागपूर : अमेय प्रभू यांचे 'द रॉक बाबाज अँड ऑदर स्टोरीज' हे पुस्तक म्हणजे अद्भुत लघुकथांचा संग्रह आहे. या कथा जगातील विविध भागात घडतात. मानवाचे कमजोर दुवे आणि बलस्थाने यांचे वर्णन त्यात आढळून येते. जीवनाने तुम्हाला लिंबू दिले असेल, तर त्यापासून लिंबूपाणी बनवा असा संदेत त्यातून मिळतो. (Review of Ameya Prabhu’s ‘The Rock Babas and Other Stories’)
संग्रहात एकूण नऊ कथा असून, तीन तासांच्या चित्रपटांपेक्षा मोठ्या असलेल्या वेबसिरीजला चिकटून बसलेल्या पिढीचे लक्ष वेधून घेण्यात या कथा यशस्वी झाल्या आहेत.अमेय प्रभू यांचा हा पहिलाच कथासंग्रह असून, लॉकडाऊनच्या काळात त्यांना या कथा सुचल्या.
जीवनाच्या आव्हानांची ही कहाणी आहे. प्रत्येक कथेचे मध्यवर्ती पात्र नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या बदलांचे चित्र दर्शविते. 'अॅक्सिडेंटल फिलॉन्थ्रॉपिस्ट' या पहिल्याच कथेत जपानी अब्जाधीश टकाशी वाटानाबे याची कहाणी आहे. ८० व्या वाढदिवसापूर्वी तो आपली संपत्ती दान करून टाकतो.
'एजंट होल्डर' या कथेत आफ्रिकी-अमेरिकी जॅक्सन होल्डर आपल्याला भेटतो. तो स्पेशल एजंट आहे. एका कथेत उद्धट स्वीस हॉटेलचालक हेल्मट कॉफमनची कहाणी येते. हिमालयातील रॉक बाबांना भेटल्यावर त्याच्यात बदल होतो.