सीए व्यवसायात आर्टिकलशिपची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:07 AM2021-05-10T04:07:59+5:302021-05-10T04:07:59+5:30

नागपूर : सीए सर्वाेत्तम व्यवसाय असून समाजात ओळख आणि पैसाही देते. महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांसाठी आर्टिकलशिप महत्त्वाचे असून सीए व्यवसायात महत्त्वाची ...

The role of articleship is important in the CA business | सीए व्यवसायात आर्टिकलशिपची भूमिका महत्त्वाची

सीए व्यवसायात आर्टिकलशिपची भूमिका महत्त्वाची

Next

नागपूर : सीए सर्वाेत्तम व्यवसाय असून समाजात ओळख आणि पैसाही देते. महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांसाठी आर्टिकलशिप महत्त्वाचे असून सीए व्यवसायात महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचे मत नागपूर सीए शाखेच्या माजी अध्यक्षा सीए कविता लोया यांनी येथे व्यक्त केले.

नागपूर सीए शाखेतर्फे आयसीएआयच्या डब्ल्यूआयसीएएसएच्या नागपूर, अकोला, जळगाव, चंद्रपूर, वर्धा सीपीई चॅप्टरच्या सहकार्याने सीए विद्यार्थ्यांसाठी आर्टिकलशिपचे महत्त्व यावर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी नागपूर सीए शाखेचे अध्यक्ष सीए साकेत बागडिया उपस्थित होते.

सीएच्या प्रवासात आर्टिकलपशिपचे महत्त्व आणि परीक्षेचा दबाव दूर करण्यासाठी लोया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना योग्य योजना बनवाव्यात, शिक्षण घ्यावे आणि पूर्ण समर्पण आणि प्रतिबद्धतेसोबत आर्टिकलशिप करण्याचे आवाहन केले. परीक्षेदरम्यान स्वत:मध्ये आत्मविश्वास बाळगावा आणि शक्य होईल तेवढ्या टेस्ट सिरीज करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तीन तासांचा पेपरचे योग्यरित्या व्यवस्थापन करावे.

‘विकासा’ नागपूर शाखेचे अध्यक्ष सीए जितेन सागलानी म्हणाले, सीए विद्यार्थ्यांनी व्यावसायिक बनण्यासाठी तीन वर्षांचे महत्त्व जाणून घ्यावे. आर्टिकलशिप करताना विद्यार्थ्यांना अनेक चुकांमधून शिकता येते. त्यामुळे भविष्यात चूक होत नाही.

सीए नितीन अळसी म्हणाले, विद्यार्थ्यांना आर्टिकलपशिप करताना अनेक महत्त्वपूर्ण बाबी शिकता येतात. आर्टिकलशिप लर्निंग, अप्लीकेशन आणि लीडरशीपयुक्त असते. स्पर्धेच्या युगात सीएला एक चांगला वक्ता, कौशल सादरीकरण आणि शब्द साठा असणे आवश्यक आहे. याकरिता विद्यार्थ्यांना अनुभव संपन्न असावे. सीए रूपम बरडिया यांनी सीए परीक्षेची भीती आणि त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या तणावाची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी शून्यातून अभ्यासाची सुरुवात करावी. सीए रवी ताओरी सक्षम मानसिकता आणि आत्मविश्वासाने सीए परीक्षा उत्तीर्ण करता येऊ शकते, असे सांगितले. त्याकरिता नियमितपणे मानसिक व्यायाम करण्याचा सल्ला दिला.

आभार ‘विकासा’ अकोला शाखेचे अध्यक्ष सीए दीपक अग्रवाल यांनी मानले. संचालन नागपूर ‘विकासा’ टीमचे अमेय सोमन, अविरल बारंगे, करण अग्रवाल, करण ताजने, पराग जैन, राधिका तनेजा आणि रवीना तायडे यांनी केले.

Web Title: The role of articleship is important in the CA business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.