कलावंत घडविण्यासाठी कलासंस्थांची भूमिका महत्त्वाची

By admin | Published: January 13, 2016 03:38 AM2016-01-13T03:38:00+5:302016-01-13T03:42:48+5:30

सर्वांमध्ये काहीतरी कलागुण असतात. या कलागुणांना प्रगट करण्यासाठी माध्यमांची गरज असते.

Role of artists is important for the artist | कलावंत घडविण्यासाठी कलासंस्थांची भूमिका महत्त्वाची

कलावंत घडविण्यासाठी कलासंस्थांची भूमिका महत्त्वाची

Next

कांचन गडकरी : कलार्जन महास्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा
नागपूर : सर्वांमध्ये काहीतरी कलागुण असतात. या कलागुणांना प्रगट करण्यासाठी माध्यमांची गरज असते. कला संस्थांनी अशा कलावंतांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्यास, आपल्यातूनच एखादा चांगल्या कलावंताची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे कलावंत घडविण्यासाठी कलासंस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचन गडकरी यांनी व्यक्त केले.
कलार्जन फाऊंडेशन, स्वराज जनकल्याणकारी ग्रामीण विकास संस्था व नागपूर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कलार्जन महास्पर्धेचे आयोजन यशवंत स्टेडियमवर करण्यात आले होते. यात चित्रकला, रांगोळी, मेहंदी व लिखो मन की बात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे पुरस्कार वितरण सोहळा कांचन गडकरी यांच्या अध्यक्षतेत पार पडला. या कार्यक्रमाला कीर्तीदा अजमेरा, महापालिकेचे शिक्षण सभापती गोपाल बोहरे, नगरसेविका रश्मी फडणवीस, सारिका नांदूरकर, बंडू राऊत यांच्यासह सुनिता धोटे, स्नेहा मोहिते, मनोज धोटे, पोलीस निरीक्षक माने, सुनिल वाघमारे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत ५ हजारावर स्पर्धकांनी भाग घेऊन, आपल्यातील कला प्रदर्शित केल्या होत्या. स्पर्धकांनी साकारलेल्या कलाकृतीचे प्रदर्शनही लावण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांसाठी चार गटात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
अ गटात प्रशम थुल, ब गटात खुशी गंगोत्री, क गटात आरती पटेल, ड गटात अनुष्का चंदा व महाविद्यालयीन गटात मनोज चोपडे यांनी प्रथम पुरस्कार पटकाविला. तर मतिमंद गटात सागर नागोरे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकाविला. रांगोळी स्पर्धेत वयस्क गटात प्रतिमा हंबरडे, युवकांच्या गटात योगेश हेडाऊ व शालेय गटात रुपाली फाले यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या पुरस्कर्त्यांना पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व रोख देऊन गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Role of artists is important for the artist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.