भाजपला रोखणे हीच रिपब्लिकन पक्षाची भूमिका : दिलीप जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 09:43 PM2019-07-20T21:43:44+5:302019-07-20T21:45:50+5:30

लोकसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष आघाडीला मिळालेल्या अपयशाला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची उदासीन मानसिकताच कारणीभूत आहे. भाजपला रोखणे हीच रिपब्लिकन पक्षाची मुख्य भूमिका आहे. तेव्हा लोकसभा निवडणुकीत झालेली चूक येत्या विधानसभा निवडणुकीत होऊ नये, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने रिपब्लिकन पक्षाशी सन्मानपूर्वक चर्चा करावी, असे इशारावजा आवाहन ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी शनिवरी येथे पत्रपरिषदेत केले.

Role of the Republican Party to prevent BJP: Dilip Jagtap | भाजपला रोखणे हीच रिपब्लिकन पक्षाची भूमिका : दिलीप जगताप

भाजपला रोखणे हीच रिपब्लिकन पक्षाची भूमिका : दिलीप जगताप

googlenewsNext
ठळक मुद्दे काँग्रेस-राष्ट्रवादीने सन्मानपूर्वक चर्चा करावी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष आघाडीला मिळालेल्या अपयशाला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची उदासीन मानसिकताच कारणीभूत आहे. भाजपला रोखणे हीच रिपब्लिकन पक्षाची मुख्य भूमिका आहे. तेव्हा लोकसभा निवडणुकीत झालेली चूक येत्या विधानसभा निवडणुकीत होऊ नये, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने रिपब्लिकन पक्षाशी सन्मानपूर्वक चर्चा करावी, असे इशारावजा आवाहन ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी शनिवरी येथे पत्रपरिषदेत केले.
जगताप यांनी सांगितले की, भाजप-सेनेला रोखण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे विविध गट व इतर समविचारी पक्षांनी एकही लोकसभेची जागा न लढता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला जाहीरपणे पाठिंबा दिला होता. मात्र आघाडी रिपब्लिकन नेतृत्वाला विश्वासात न घेता निवडणुकीला सामोरे गेली. त्यामुळे समविचारी मते आघाडीला मिळू शकली नाही. तेव्हा लोकसभेत झालेली चूक येत्या विधानसभेत तरी करू नका, विधानसभा निवडणुकीत सन्मानपूर्वक चर्चा करा, अन्यथा रिपब्लिकन आघाडीची व्याप्ती वाढवून विधानसभेत स्वतंत्रपणे १०० जागा लढवू, असा इशाराही त्यांनी दिला.
पत्रपरिषदेत रिपाइंचे ज्येष्ठ नेते हरिदास टेंभुर्णे, दिनेश गोडघाटे, खोरिपचे अमृत गजभिये, अशोक भिवगडे, उमेश टेंभुर्णे आदी उपस्थित होते.

Web Title: Role of the Republican Party to prevent BJP: Dilip Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.