नागपूरच्या आमदार निवासातील विलगीकरण कक्षाच्या खोल्या अस्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 11:07 PM2020-03-23T23:07:55+5:302020-03-23T23:46:30+5:30

आमदार निवासाच्या विलगीकरण कक्षात अस्वच्छता, उशीचे मळकट कव्हर, रक्ताचे डाग असलेले टॉवेल, सफाईचा अभाव असलेले स्वच्छतागृह, खिडक्यांवर धूळ व लिफ्टमध्ये खऱ्र्याच्या पिचकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होताच खळबळ उडाली.

The rooms of the separation room in MLA residence of Nagpur are unclean | नागपूरच्या आमदार निवासातील विलगीकरण कक्षाच्या खोल्या अस्वच्छ

नागपूरच्या आमदार निवासातील विलगीकरण कक्षाच्या खोल्या अस्वच्छ

Next
ठळक मुद्देरक्ताने माखलेले टॉवेल, घाणेरड्या शौचालयाचा व्हिडिओ व्हायरल

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : आमदार निवासाच्या विलगीकरण कक्षात अस्वच्छता, उशीचे मळकट कव्हर, रक्ताचे डाग असलेले टॉवेल, सफाईचा अभाव असलेले स्वच्छतागृह, खिडक्यांवर धूळ व लिफ्टमध्ये खऱ्र्याच्या पिचकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होताच खळबळ उडाली. याची दखल स्वत: विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी घेतली. त्यांनी बांधकाम विभागाला स्वच्छतेकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोहा आणि शारजा येथून येणाºया प्रवांशांची थर्मल स्क्रिनिंग करून आमदार निवासात सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात ठेवले जाते. यात ६० वर्षांवरील वयोगटातील प्रवाशांना पुढील १४ दिवस येथेच ठेवण्यात येते. तर या वयोगटापेक्षा कमी प्रवासू जे नागपूरवासी आहेत त्यांना २४ तास ठेवल्यानंतर व कुठलीही लक्षणे आढळून न आल्यास सुटी देऊन घरीच थांबण्याचा सल्ला दिला जाते. कुठल्या प्रवाशाला ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे आढळल्यास मेयो, मेडिकलमध्ये पाठविले जाते. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाºया आमदार निवासात या प्रवाशांसाठी इमारत क्र. १ येथे १५० तर इमारत क्र. २ मध्ये ५० खोल्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. रविवारी इमारत क्र. १ येथे ८७ प्रवाशांना थांबविण्यात आले होते. यातील एका प्रवाशाने खोली क्र. ४५८मधील अस्वच्छतेचा व्हिडिओ बनविला. यात बेडशीटवर डाग, खिडक्यांवर साचलेली धूळ, अस्वच्छ शौचालय, लिफ्टमध्ये पान-खऱ्र्यांच्या पिचकाऱ्या तर दुसऱ्या एका खोलीत रक्ताने माखलेले टॉवेल्स, उशांचे कव्हरचे फोटो व्हायरल केले. या फोटो आणि व्हिडिओची गंभीर दखल विभागीय आयुक्तांनी घेतली. त्यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला जाबही विचारल्याचे समजते. या व्हिडिओने आमदार निवसातील अस्वच्छता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

स्वच्छतेकडे आणखी लक्ष देणार
आमदार निवासाची जबाबदारी असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता लक्ष्मीकांत राऊळकर यांनी सागितले, खोली रिकामी होताच महानगरपालिकेकडून फवारणी करून साफसफाई केली जाते. निर्जंतुकीकरण केलेले टॉवेलपासून ते बेडशीट टाकली जाते. प्रवाशांना कुठलीही अडचण होऊ नये याकडे विशेष लक्ष दिले जाते. प्रवाशाच्या तक्रारीची दखल घेऊन सफाईकडे आणखी लक्ष दिले जात आहे. विशेष म्हणजे, आमदार निवासातील विलगीकरण कक्षाची स्तुती करणारे काही प्रवाशांचे व्हिडिओही आमच्याकडे आहेत, असेही ते म्हणाले.

पालकमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल
दरम्यान पालकमंत्री नितीन राऊत यांनी याची गंभीर दखल घेतली. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कोरोनासंबंधीच्या बैठकीत त्यांनी हा विषय आवर्जून काढत आमदार निवास येथे सुरू असलेल्या विलगीकरण केंद्रात स्वच्छतेसह आवश्यक सुविधा तात्काळ पुरविण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या.

Web Title: The rooms of the separation room in MLA residence of Nagpur are unclean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.