राजभवनातील गुलाब ठरले राजा आणि राजकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:11 AM2020-01-28T00:11:23+5:302020-01-28T00:14:57+5:30

राजभवनातील ‘बहुरूपी’ या गुलाबाने किंग ऑफ रोजेसचा पुरस्कार पटकावला. तर क्वीन ऑफ रोझेस हा पुरस्कार ‘लेडी रोझ’ या गुलाबासाठी दुधलवार यांनी पटकावला. तसेच प्रिन्स ऑफ रोझेस हा पुरस्कार ‘वेटेरान्स ऑनर’ या गुलाबाकरिता राजभवनाच्या प्रभारी अधिकाऱ्यांना मिळाला.

Roses in the Rajbhavan become king and prince | राजभवनातील गुलाब ठरले राजा आणि राजकुमार

राजभवनातील गुलाब ठरले राजा आणि राजकुमार

googlenewsNext
ठळक मुद्देविधानभवनातील पुष्प प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपवने व उद्याने विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही विधानभवन परिसरात पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यंदा राजभवनातील ‘बहुरूपी’ या गुलाबाने किंग ऑफ रोजेसचा पुरस्कार पटकावला. तर क्वीन ऑफ रोझेस हा पुरस्कार ‘लेडी रोझ’ या गुलाबासाठी दुधलवार यांनी पटकावला. तसेच प्रिन्स ऑफ रोझेस हा पुरस्कार ‘वेटेरान्स ऑनर’ या गुलाबाकरिता राजभवनाच्या प्रभारी अधिकाऱ्यांना मिळाला. प्रिन्सेस ऑफ रोझ हा पुरस्कार ‘चार्ल्स अझनवार’ या गुलाबाकरिता हिस्लॉप कॉलेजने पटकावला.
दोन दिवसीय प्रदर्शनामध्ये विविध रंगांचे गुलाब, झेनिया, झेंडू, जरबेरा यांच्यासह अनेक आकर्षक फुलांची सुंदर आरास होती. फुलांचा राजा गुलाब मोहवणारा असतोच, मात्र काटेरी निवडुंगसुद्धा अत्यंत आकर्षक दिसत होते. ताजी व टवटवीत फुले व त्यांच्या विविध आकर्षक रचना या प्रदर्शनात मांडल्या आहेत. हंगामी फुले, शोभिवंत फुलझाडे, लँडस्केप ऑन द स्पॉट व उद्यान स्पर्धा या विविध विभागातून ८०० प्रवेशिका आल्या होत्या. एकूण ५१ स्पर्धकांनी भाग घेतला; सोबतच औषधी वनस्पती, कुंड्यांमध्ये माहितीसह ठेवण्यात आले हेते. रेखा शरद देशमुख यांना या प्रदर्शनात सर्वात जास्त पुरस्कार मिळाले. बक्षीस वितरण मुख्य अभियंता उल्लास देबडवार यांच्या हस्ते व विद्याधर सरदेशमुख यांच्या उपस्थितीत पार पडले.

Web Title: Roses in the Rajbhavan become king and prince

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.