गावागावात मतांची गोळाबेरीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:07 AM2021-01-17T04:07:51+5:302021-01-17T04:07:51+5:30

नागपूर : जिल्ह्यात १२७ ग्रा.पं.साठी ७४.८९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कोणत्या वाॅर्डात किती लोकांनी मतदान केले. कुणी मतदान ...

Rounding of votes in villages | गावागावात मतांची गोळाबेरीज

गावागावात मतांची गोळाबेरीज

Next

नागपूर : जिल्ह्यात १२७ ग्रा.पं.साठी ७४.८९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कोणत्या वाॅर्डात किती लोकांनी मतदान केले. कुणी मतदान केले नाही. कोणत्या गल्लीने कोणते पॅनेल चालविले, या चर्चांना गावाच्या चावडीवर शनिवारी उधाण आले होते. मतांच्या या गोळाबेरीजेचा फैसला सोमवारी, (दि.१८) मतमोजणीनंतर होईल. जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. यानंतर दुपारी ३ वाजेपर्यंत गावकारभारी स्पष्ट होतील. याच दिवशी गावात कुणाची सत्ता स्थापन होईल, हेही निश्चित होईल.

जिल्ह्यात एकूण १३० नियोजित ग्रामपंचायतींपैकी सोनपूर (कळमेश्वर) व जटामखोरा (सावनेर) या ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यासोबत कुही तालुक्यातील देवळी कला ग्रामपंचायतीची निवडणूक मतदार यादीतील घोळामुळे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे १२७ ग्रामपंचायतींच्या १,०८६ जागांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. तीत एकूण ३,०१५ उमेदवाराचे भाग्य मशीनबंद झाले. बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीविरुद्ध भाजपसमर्थित पॅनल अशी लढत झाली आहे. काटोल तालुक्यात ३ ग्रा.पं.साठी २,९५९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात १५५६ पुरुष तर १४०३ महिला मतदारांचा समावेश आहे. नरखेड तालुक्यात १७ ग्रा.पं.साठी मतदान झाले. येथे २१,५७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ११,५०२ पुरुष तर १०,०७० महिलांचा समावेश आहे. नरखेड आणि काटोलमध्ये काँग्रेस,राष्ट्रवादी समर्थित पॅनेलची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथे त्यांची भाजप समर्थित पॅनेलसोबत थेट लढत होती.

सावनेर तालुक्यात मताचा टक्का काहीअंशी घसरला आहे. तालुक्यात ११ ग्रा.पं.साठी २०,९८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यात ११,१२३ पुरुष तर ९,८६६ महिला मतदारांचा समावेश आहे. सावनेरमध्ये कॉँग्रेस आणि भाजप समर्थित पॅनेलमध्ये थेट लढत झाली आहे. कळमेश्वर तालुक्यात ४ ग्रा.पं.साठी ६,६१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ३,४०० पुरुष तर ३,२१७ महिला मतदारांचा समावेश आहे. येथे काँग्रेस विरुद्ध भाजप समर्थित पॅनेल अशी लढत झाली आहे. रामटेक तालुक्यात ९ ग्रा.पं.साठी १४,७२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ७,५४७ पुरुष तर ७१७७ महिला मतदारांचा समावेश आहे. पारशिवनी तालुक्यात १० ग्रा.पं.साठी १२,४४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ६,६८७ पुरुष तर ५,७५४ महिला मतदारांचा समावेश आहे.

मौदा तालुक्यात ७ ग्रा.पं.साठी १०,०८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ५,२७८ पुरुष तर ४,८०२ महिला मतदारांचा समावेश आहे. कामठी तालुक्यात ९ ग्रा.पं.साठी १६,९९४ ग्रा.पं.साठी ८,९०० पुरुष तर ८,०९४ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. उमरेड तालुक्यात १४ ग्रा.पं.साठी १५,११९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ८,१२३ तर ६,९९६ महिला मतदारांचा समावेश आहे.

भिवापूर तालुक्यात ३ ग्रा.पं.साठी ४,३६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात २,३१९ पुरुष तर २,०४५ महिला मतदारांचा समावेश आहे. कुही तालुक्यात २४ ग्रा.पं.साठी ६०,८८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ३२,३६० पुरुष तर २८,५२६ महिला मतदारांचा समावेश आाहे. नागपूर ग्रामीण तालुक्यात ११ ग्रा.पं.साठी ४१,५७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात २१,८६१ पुरुष तर १९,७१४ महिला मतदारांचा समावेश आहे. हिंगणा तालुक्यात ५ ग्रा.पं.साठी ९,२५९ मतदारांनी मतदान केले. यात ४,८२२ पुरुष तर ४,४३७ महिला मतदारांचा समावेश आहे.

तालुकानिहाय मतदान (टक्के)

काटोल : ८६.४२

नरखेड : ८१.४१

सावनेर : ६९.३६

कळमेश्वर : ७८.९६

रामटेक : ७६.९४

पारशिवनी : ८०.५७

मौदा : ९०.७१

कामठी : ७७.८७

उमरेड : ८५.१५

भिवापूर : ७९.०६

कुही : ८४.४२

नागपूर (ग्रा.) : ५६.३८

हिंगणा : ७७.०२

Web Title: Rounding of votes in villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.