कामठी शहरात पाेलिसांचा रूटमार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:07 AM2021-03-29T04:07:28+5:302021-03-29T04:07:28+5:30
कामठी : हाेळी, धूलिवंदन तसेच आगामी सण व उत्सव काळातील कायदा व सुव्यवस्था लक्षात घेता कामठी शहरात कामठी (नवीन) ...
कामठी : हाेळी, धूलिवंदन तसेच आगामी सण व उत्सव काळातील कायदा व सुव्यवस्था लक्षात घेता कामठी शहरात कामठी (नवीन) व कामठी (जुनी) पाेलिसांनी विविध महत्त्वाच्या मार्गांनी रूटमार्च केला.
कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याच्या आवारातून या रूटमार्चला सुरुवात करण्यात आली. हा मार्च पोलीस लाइन, नया गुदाम, इस्माईलपुरा, येरखेडा, दुर्गा चौक, टीचर कॉलनी, प्रीती लेआउट, मरारटोली, पंकज मंगल कार्यालय चौक, पारसीपुरा, जय भीम चौक, लकडगंज, कामगारनगर, रमानगर, बसस्थानक चौक, मोडा, मोदी पडाव, खलासी लाइन, संजय नगर, भाजी मंडी, बोरकर चौक, कोळसा टाल, रब्बानी चौक, फेरूमल चौक, शुक्रवारी बाजार, गोयल टाॅकीज चौक, जयस्तंभ चौक, हरदास नगर, हैदरी चौक, मेन रोडमार्गे नगर भ्रमण करीत कामठी (जुनी) पोलीस ठाण्याच्या आवारात पाेहाेचला. तिथे या रूट मार्चची सांगता करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधून होळी, धूलिवंदन, शब्बे बारात, शिवजयंतीच्या पर्वावर शहरात कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
पोलीस उपायुक्त नीलोत्पल व सहायक पोलीस उपायुक्त रोशन पंडित यांच्या नेतृत्वातील या रूटमार्चमध्ये कामठी (नवीन)चे ठाणेदार संजय मेंढे, कामठी (जुनी)चे ठाणेदार विजय मालचे, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, युनूस शेख, राजेश पाटील यांच्यासह दाेन्ही पाेलीस ठाण्यातील पाेलीस अधिकारी, कर्मचारी, अतिशीघ्र कृती पोलीस दलाचे जवान, राज्य राखीव पाेलीस दलाचे जवान, दाेन्ही पाेलीस ठाण्यातील वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी व होमगार्ड सहभागी झाले हाेते.