सावनेर शहरात पाेलिसांचा रुट मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:08 AM2021-04-24T04:08:53+5:302021-04-24T04:08:53+5:30
सावनेर : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी नागरिकांनी विविध स्वत:साेबतच इतरांची काळजी घ्यावी तसेच त्यासाठी विविध उपाययाेजनांचे पालन करावे, यासाठी सावनेर ...
सावनेर : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी नागरिकांनी विविध स्वत:साेबतच इतरांची काळजी घ्यावी तसेच त्यासाठी विविध उपाययाेजनांचे पालन करावे, यासाठी सावनेर पाेलिसांनी शहरातील विविध भागात शुक्रवारी (दि. २३) रुट मार्च करीत जनजागृती केली.
यावेळी पाेलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्कचा नियमित वापर करा, खरेदी करतेवेळी दुकानासमाेर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करा, विनाकारण फिरणे टाळा, मनात भीती न बाळगता काेराेना लसीकरण करवून घ्या, असे आवाहन केले. उपाययाेजनांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक व प्रसंगी कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला. उपविभागीय अधिकारी (महसूल) अतुल म्हेत्रे व उपविभागीय पाेलीस अधिकारी अशाेक सरंबळकर यांच्या नेतृत्वातील या रुट मार्चमध्ये ठाणेदार मारुती मुळूक यांच्यासह महसूल, पाेलीस, पंचायत विभागासह नगर परिषद अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले हाेते. सावनेर शहरासह तालुक्यात काेराेना संक्रमण व मृत्यूदर वाढत असताना तरुणांमधील बेजबाबदारपणा कायम असल्याचे दिसून येते.