तीन जुगार अड्ड्यांवर धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:12 AM2021-09-04T04:12:26+5:302021-09-04T04:12:26+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : पाेलिसांनी पाेळ्याच्या पार्श्वभूमीवर जुगार व अवैध दारूविक्री विराेधात धाडसत्र सुरू केले आहे. पाेलिसांच्या पथकाने ...

Rows at three gambling dens | तीन जुगार अड्ड्यांवर धाडी

तीन जुगार अड्ड्यांवर धाडी

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर : पाेलिसांनी पाेळ्याच्या पार्श्वभूमीवर जुगार व अवैध दारूविक्री विराेधात धाडसत्र सुरू केले आहे. पाेलिसांच्या पथकाने सावनेर शहर तसेच पाटणसावंगी व धापेवाडा येथील जुगारावर टाकलेल्या नऊ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून एकूण ५,५२० राेख व जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले.

सावनेर पाेलिसांच्या पथकाने सावनेर, पाटणसावंगी व धापेवाडा (ता. कळमेश्वर) परिसरातील जुगारावर टाकलेल्या धाडीत जुगार खेळणाऱ्या रमेश ईश्वरचरण धनवले, रा. मुरलीधर मंदिर, सावनेर, सुरेश रामदास बडखाणे, रा. सटवा माता मंदिर, सावनेर, नामदेव तुळशीराम सेठे, रा. धापेवाडा, ता. कळमेश्वर, बबन तुलाराम श्यामकुळे धापेवाडा, ता. कळमेश्वर, दिनेश सुखदेव भारती, रा. पिपळा (किनखेडे), ता. सावनेर, ईश्वर उमराव शेंडे, रा. पाटणसावंगी, ता. सावनेर, चिंतामन सखाराम राऊत, रा. पाटणसावंगी, ता. सावनेर, संदीप महादेव खरबडे, रा. तेलकामठी, ता. कळमेश्वर, राहुल सुखदेव गोडसे, रा. तेलकामठी, ता. कळमेश्वर यांना अटक करण्यात आली.

या तिन्ही कारवाईमध्ये पाेलिसांनी अटकेतील जुगाऱ्यांकडून ५,५२० राेख व जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले, अशी माहिती ठाणेदार मारुती मुहूक यांनी दिली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सागर कारंडे, उपनिरीक्षक सतीश पाटील, पोलीस हवालदार संजय शिंदे, संदीप नागरे, विजय पांडे यांच्या पथकाने केली.

...

अवैध दारूविक्रेते अटकेत

सावनेर पाेलिसांच्या पथकाने विविध ठिकाणी टाकलेल्या धाडीत १४ अवैध दारूविक्रेत्यांना अटक केली. यात प्रमोद बंडू पैदाम, रा. माळेगाव, ता. सावनेर, आशिष मधुकर भिंगाटे, रा. गुजरखेडी, ता. सावनेर, अशोक नारायण बन्सोड, रा. बोरुजवाडा, ता. सावनेर, किरण अशोक हरकंडे, प्रशांत भगवान बरवड व अशोक माधवराव बरवड तिघेही रा. धापेवाडा, ता. कळमेश्वर, अभिषेक मारोती मोहोडे व सुरेश डोमाजी मने दाेघेही रा. पाटणसावंगी, ता. सावनेर, विनोद पांडुरंग खोडनकर व पिंटू पुंडलिक अंभोरे दाेघेही रा. सावनेर, सुरेश हरिभाऊ नानवटकर रा. हेटी, ता. सावनेर यांच्यासह सावनेर शहरातील दाेन महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून १७,०८० रुपये किमतीची माेहफूल व देशी दारू जप्त करण्यात आली.

Web Title: Rows at three gambling dens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.