राॅयल्टी परभणीतील, खाेदकाम नागपूर जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:12 AM2021-08-12T04:12:27+5:302021-08-12T04:12:27+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : उपविभागीय अधिकारी (महसूल) श्याम मदनूरकर यांच्या पथकाने कुंभारी (ता. माैदा) शिवारात मंगळवारी (दि. १०) ...

In Royalty Parbhani, Excavation in Nagpur District | राॅयल्टी परभणीतील, खाेदकाम नागपूर जिल्ह्यात

राॅयल्टी परभणीतील, खाेदकाम नागपूर जिल्ह्यात

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : उपविभागीय अधिकारी (महसूल) श्याम मदनूरकर यांच्या पथकाने कुंभारी (ता. माैदा) शिवारात मंगळवारी (दि. १०) दुपारी केलेल्या कारवाईमध्ये गाैण खनिजाची अवैध वाहतूक करणारे दाेन ट्रक पकडले. या प्रकरणात वाहतूकदारांनी राॅयल्टीचा दुरुपयाेग केल्याचे निष्पन्न झाले आहे. ट्रकचालकाकडे असलेली राॅयल्टी परभणी जिल्ह्यातील असून, गाैण खनिजाचे खाेदकाम व चाहतूक नागपूर जिल्ह्यात केली जात असल्याचे चाैकशीत निष्पन्न झाले.

कुंभारी परिसरातील मुरुमाची उचल व वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांनी पाहणी केली. यात त्यांनी एमएच-२९/बीई-३३९१ व एमएच-४०/बीएल-११११ क्रमांकाचे दाेन ट्रक थांबवून झडती घेतली. त्या ट्रकमध्ये मुरुम आढळून येताच त्यांची राॅयल्टीची तपासणी केली. ट्रकचालकांकडे पाचगाव परिसरातील बजरंग नामक कंत्राटदाराकडील राॅयल्टी स्लिप हाेत्या.

त्या स्लिपवर कुंभारी, जिल्हा परभणी असा उल्लेख हाेता. त्याचा राॅयल्टीचा वापर करून कुंभारी, ता. माैदा, जिल्हा नागपूर येथून मुरुमाचे खाेदकाम व वाहतूक केले जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी दाेन्ही ट्रक जप्त करून माैदा पाेलीस ठाण्याच्या आवारात जमा केले. ते ट्रक राहुल बोलसंवर रा. पाटेकुरा, ता. अर्जुनी, जिल्हा गोंदिया व विनोद दहाके, रा. माथनी, ता. मौदा या दाेघांच्या मालकीचे असल्याचे ट्रकचालकांनी सांगितले.

Web Title: In Royalty Parbhani, Excavation in Nagpur District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.