महिलेसह ९ तिकिट दलालांवर आरपीएफची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:25 AM2020-12-14T04:25:39+5:302020-12-14T04:25:39+5:30
३१७४६ रुपयांची १४ ई-तिकिटे जप्त : १९५ जुनी तिकिटेही सापडली नागपूर : रेल्वे सुरक्षा दल नागपूरने संपूर्ण विभागात एकाच ...
३१७४६ रुपयांची १४ ई-तिकिटे जप्त : १९५ जुनी तिकिटेही सापडली
नागपूर : रेल्वे सुरक्षा दल नागपूरने संपूर्ण विभागात एकाच दिवशी धाड टाकून महिलेसह नऊ अवैध तिकीट दलालांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३१७४६ रुपयांची १४ लाईव्ह तिकिटे आणि १९५ जुन्या तिकिटांसह एकुण ३ लाख ४३ हजार १५२ रुपयांची तिकिटे जप्त केली आहेत. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूरसह बल्लारपुर, मूलताई, वर्धा, माजरी आणि चंद्रपूरमध्ये धाडी टाकण्यात आल्या. पकडण्यात आलेल्या सर्व दलालांविरुद्ध रेल्वे अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात तिघांना अटक
नागपूर शहरात आरपीएफने तीन दलालांना अटक केली आहे. यात जरीपटका येथील रहिवासी स्वाती किसन चंदरामनानी, इकबाल अहमद आणि भांडेवाडी येथील रहिवासी पवन शंभु पांडे अशी या दलालांची नावे आहेत. यातील स्वातीकडे आयआरसीटीसीचे अधिकृत लायसन्स असूनही ती पर्सल आयडी वरून तिकिट काढून प्रवाशांकडून कमिशन वसुल करीत होती. तिच्याकडून ८०७८ रुपयांच्या ९ जुन्या तिकीट जप्त करण्यात आल्या. तसेच भांडेवाडी येथील रहिवासी पवन जवळ ७७८७९ रुपयांच्या ६२ तिकीट मिळाल्या. या तिकीट त्याने बनावट आयडीवरून काढल्या होत्या. तर तर मुन्नी ऑनलाईन सर्व्हिसेसच्या नावाने दुकान चालविणाऱ्या इकबाल अहमदजवळ ८३३५ रुपयांच्या ७ तिकीट मिळाल्या. ही तिकिटेही त्याने बनावट आयडीवरून बुक करून ग्राहकांकडून कमिशन वसूल करीत होता.
माजरीत १.६२ लाखाच्या तिकीट जप्त
चंद्रपूर येथील माजरी येथून आर वर्ल्ड कॅफेचे संचालक रामनंद कैलाश मिस्त्री यांच्याकडून सर्वात अधिक १ लाख ६२ हजार २९० रुपयांच्या तिकिट मिळाल्या. यातील २९१४९ रुपयांच्या १२ लाईव्ह तिकिट आणि १ लाख ३३ हजार १४० रुपयांच्या पोस्ट तिकीट होत्या. विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत विभागीय मुख्यालयातून विशेष टीम तयार करून नागपूर, अजनी, बल्लारशाह, आमला, चंद्रपूर आणि वर्धा येथे पाठविण्यात आल्या. तेथून स्थानिक आरपीएफ अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने धाडी टाकण्यात आल्या.
...............