राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाविरुद्ध १०० कोटी रुपयाचा मानहानी दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 10:08 PM2019-04-15T22:08:30+5:302019-04-15T22:09:51+5:30

शहरातील प्रसिद्ध उद्योजक मनीष मेहता यांनी राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाविरुद्ध वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात १०० कोटी रुपयाचा मानहानी दावा दाखल केला आहे. महामंडळाने विनाकारण विविध फौजदारी व दिवाणी प्रकरणांत गोवल्यामुळे आपली सर्वत्र बदनामी झाली, असे मेहता यांचे म्हणणे आहे. त्यांनी महामंडळाकडून १०० कोटी रुपये भरपाई मिळण्याची मागणी केली आहे. तसेच, महामंडळाला संबंधित खोटी प्रकरणे दाखल करण्याचा अधिकार नसल्याचे घोषित करण्यात यावे व यापुढे त्यांना अशी प्रकरणे दाखल करण्यास मनाई करण्यात यावी, अशी विनंती केली आहे. न्यायालयाने महामंडळाला नोटीस बजावून यावर २६ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.

Rs 100 crore defamation suit filed against National Small Industries Corporation | राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाविरुद्ध १०० कोटी रुपयाचा मानहानी दावा

राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाविरुद्ध १०० कोटी रुपयाचा मानहानी दावा

Next
ठळक मुद्देउद्योजक मनीष मेहता : विनाकारण विविध प्रकरणांत गोवल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील प्रसिद्ध उद्योजक मनीष मेहता यांनी राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाविरुद्ध वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात १०० कोटी रुपयाचा मानहानी दावा दाखल केला आहे. महामंडळाने विनाकारण विविध फौजदारी व दिवाणी प्रकरणांत गोवल्यामुळे आपली सर्वत्र बदनामी झाली, असे मेहता यांचे म्हणणे आहे. त्यांनी महामंडळाकडून १०० कोटी रुपये भरपाई मिळण्याची मागणी केली आहे. तसेच, महामंडळाला संबंधित खोटी प्रकरणे दाखल करण्याचा अधिकार नसल्याचे घोषित करण्यात यावे व यापुढे त्यांना अशी प्रकरणे दाखल करण्यास मनाई करण्यात यावी, अशी विनंती केली आहे. न्यायालयाने महामंडळाला नोटीस बजावून यावर २६ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.
महामंडळाने २००१ मध्ये नागपूर फाऊंड्रीज कंपनीविरुद्ध धनादेश अनादराचे प्रकरण न्यायालयात दाखल केले. त्या प्रकरणात मेहता यांना कंपनीचे संचालक म्हणून प्रतिवादी करण्यात आले होते. वास्तविक मेहता यांचा या कंपनीशी काहीच संबंध नाही. यासंदर्भात महामंडळाला पूर्ण माहिती होती. परंतु, त्यांना वाईट हेतूने या प्रकरणात गोवण्यात आले. तसेच, त्यांच्यावर आधारहीन आरोप करण्यात आले. न्यायालयात तथ्ये तोडूनमोडून सादर करण्यात आले. त्यामुळे न्यायालयाने मेहता यांना नोटीस बजावली. याशिवाय महामंडळाने नागपूर फाऊंड्रीज कंपनीविरुद्ध १५ लाख ४४ हजार ४४८.१५ रुपये वसुलीचा दावा दाखल केला. त्यातदेखील मेहता यांना प्रतिवादी करण्यात आले. २००५ मध्ये पृथ्वी इस्पात कंपनीविरुद्ध दाखल धनादेश अवमानना प्रकरणात,२००२ मध्ये पार्श्व इंजिनियरिंग कंपनीविरु द्ध दाखल वसुली दाव्यात व अन्य काही प्रकरणांतही मेहता यांना विनाकारण प्रतिवादी करण्यात आले, असे दाव्यात नमूद करण्यात आले आहे. मेहता यांनी या दाव्यासोबत त्यांच्या समर्थनातील साक्षीदारांची यादी व आवश्यक कागदपत्रे न्यायालयात दाखल केली आहेत. मेहता यांच्यातर्फे अ‍ॅड. विनोद सिंग यांनी कामकाज पाहिले.
महामंडळाचा हेतू वाईट
मेहता हे प्रतिष्ठित उद्योजक व नागरिक आहेत. ते अनेक संघटनांमध्ये वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांनी महामंडळाकडे कधीच आर्थिक मदतीची मागणी केली नाही. तसेच, महामंडळानेही त्यांना कधीच कोणत्याही प्रकारची रक्कम दिली नाही. असे असताना महामंडळाने विविध फौजदारी प्रकरणांमध्ये मेहता यांना वाईट हेतूने प्रतिवादी केले. तसेच, त्यांच्यावर विविध प्रकारचे गंभीर आरोप केले, असा आरोप दाव्यात करण्यात आला आहे.

Web Title: Rs 100 crore defamation suit filed against National Small Industries Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.