नागपुरातील गणेश टेकडी मंदिरतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी ११ लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 05:51 PM2020-04-03T17:51:22+5:302020-04-03T17:52:11+5:30
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व नागपूर विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या उपस्थितीत श्री गणेश मंदिर येथे मंदिर प्रशासनातर्फे ११ लाख रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री निधीमध्ये प्रदान करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील प्राचीन अशा गणेश टेकडी मंदिर प्रशासनातर्फे महाराष्ट्र शासनाला हातभार लावण्यात येत आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व नागपूर विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या उपस्थितीत श्री गणेश मंदिर येथे मंदिर प्रशासनातर्फे ११ लाख रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री निधीमध्ये प्रदान करण्यात आला. यासोबतच लॉकडाऊनच्या काळात अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलीसांना भोजन, मसाला भात, पुरी भाजीचे ४०० पाकीटे मंदिरातर्फे २४ मार्च पासून दररोज सीताबर्डी पोलीस स्टेशनला पुरविण्यात येत आहेत. तसेच इतरत्र गरजू नागरिकांसाठीचे अन्न पोलीस गाड्यांतून ५० वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात येत आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष लखीचंद ढोंबळे, उपाध्यक्ष माधव कोहळे, सचिव संजय जोगळेकर, सहसचिव निशिकांत सगदेव, कोषाध्यक्ष के.सी. गांधी, प्रल्हाद पराते उपस्थित होते.