अंबाझरी तलावाला मजबूत करण्यासाठी २१ कोटी रुपयांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:08 AM2020-12-29T04:08:05+5:302020-12-29T04:08:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ऐतिहासिक अंबाझरी तलावाची स्थिती अतिशय खराब होऊ लागली आहे. भिंतीला भेगा पडू लागल्या आहेत. ...

Rs 21 crore needed to strengthen Ambazari Lake | अंबाझरी तलावाला मजबूत करण्यासाठी २१ कोटी रुपयांची गरज

अंबाझरी तलावाला मजबूत करण्यासाठी २१ कोटी रुपयांची गरज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ऐतिहासिक अंबाझरी तलावाची स्थिती अतिशय खराब होऊ लागली आहे. भिंतीला भेगा पडू लागल्या आहेत. तसेच दगडही उखडू लागले आहेत. तलावाच्या मजबुतीकरणासाठी २१ कोटी ६ लाख ९२ हजार ८४३ रुपयांची आवश्यकता आहे. मनपाचे सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने तलावाला मजबूत करण्यासाठी संबंधित निधीचा प्रस्ताव तयार केला आहे. निधी जास्त असल्याने रााज्य सरकारकडून विशेष अनुदानाची मागणी करण्याची तयारी मनपाने केली आहे.

तलावाच्या लागूनच मेट्रो रेल्वेचे पीलर टाकण्यात आले आहे. यामुळे तलावाला भेगा पडल्या असून याला लागून असलेल्या परिसरातील झाडांनाही नुकसान पोहोचले आहे. संबंधित प्रकरणाची तक्रार नागरिकांनी मनपाकडे केली. प्रकरण न्यायालयातही पोहोचले. यानंतर जलसंपदा विभागाने तलावाला मजबूत बनवण्यासाठी सविस्तर योजना तयार करण्याची जबाबदारी उचलली. तलावाच्या जीर्ण भिंतीला दुरुस्त करण्यासाठी ३ कोटी १४ लाख ५८ हजार ४६ रुपयाची गरज आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मेट्रो रेल्वे प्राधिकरणला ३.३५ कोटी रुपयाचा भार उचलावा लागेल. तर उर्वरित १७ कोटी ७१ लाख ९२ हजार ८४१ रुपये राज्य सरकारला मागण्यात येईल.

प्रस्तावात स्पष्ट म्हटले आहे की, मनपा संबंधित प्रकल्पासाठी कुठलाही निधी देणार नाही. मनपाच्या देखरेखीखाली तलावाचे मजबुतीकरण होईल. प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता प्रदान करून पुढील कारवाई केली जाईल. जसजसे राज्य सरकारकडून निधी मिळेल, तसतसे तलावाच्या धरणाला मजबूत केले जाईल.

बॉक्स

एनडीएसच्या जवानांना मिळणार एक्सटेंशन

मनपाच्या न्यूसेंस डिटेक्शन स्क्वॉड (एनडीएस)च्या मदतीने शहरात अतिक्रमण कारवाई, स्वच्छता मोहीम, प्लास्टिक जप्ती, मास्क न घालणाऱ्यांविरुद्ध कारवाई आदी केल्या जात आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये १०० जवानांचे कंत्राट संपले. यादरम्यान पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू होती. त्यामुळे एक्स्टेंशन मिळू शकले नाही. सध्या केवळ ८० जवानांच्या भरवशावर शहरात कारवाई सुरु आहे. २०१ पदे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी १८० जवान कार्यरत होते. परंतु १०० लाेकांचे कंत्राट संपल्याने अडचण निर्माण झाली. १ डिसेंबर २०१७ पासून १८ नोव्हेंबर २०२० दरम्यान एनडीएसने विविध प्रकारच्या कारवाई करून ८ कोटी १६ लाख ३८ हजार ४५० रुपयाचे उत्पन्न मिळविले. तर यांच्या मानधनावर ७ कोटी ४६ लाख ९५ हजार ८६३ रुपये खर्च झाले. तरीही एनडीएस ६९ लाख ४२ हजार ५८७ रुपयाने नफ्यात राहिले. एनडीएसमध्ये माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे मनपाला फायदा आहे.

Web Title: Rs 21 crore needed to strengthen Ambazari Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.