नोटाबंदीच्या वर्षात बँकांमध्ये २३ हजार कोटींचे घोटाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 09:06 PM2018-02-17T21:06:55+5:302018-02-17T21:09:00+5:30

नीरव मोदीच्या प्रकरणामुळे बँकांमधील घोटाळ्याचा विषय परत चर्चेला आला आहे. परंतु देशभरात गाजलेल्या नोटाबंदीच्या वर्षातदेखील बँकांमध्ये घोटाळे झाले होते. २०१६-१७ या आर्थिक वर्षात देशातील विविध बँकांमध्ये अनेक गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. ‘आरबीआय’च्या (रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया) अधिकृत आकडेवारीनुसार नोटाबंदीच्या वर्षात देशातील बँकांमध्ये २३ हजार कोटींहून अधिकचे घोटाळे उघडकीस आले.

Rs 23,000 crore scam in banks during the demoneytisation | नोटाबंदीच्या वर्षात बँकांमध्ये २३ हजार कोटींचे घोटाळे

नोटाबंदीच्या वर्षात बँकांमध्ये २३ हजार कोटींचे घोटाळे

Next
ठळक मुद्दे‘आरबीआय’ची आकडेवारी : ४८० कर्मचारी निलंबित

 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नीरव मोदीच्या प्रकरणामुळे बँकांमधील घोटाळ्याचा विषय परत चर्चेला आला आहे. परंतु देशभरात गाजलेल्या नोटाबंदीच्या वर्षातदेखील बँकांमध्ये घोटाळे झाले होते. २०१६-१७ या आर्थिक वर्षात देशातील विविध बँकांमध्ये अनेक गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. ‘आरबीआय’च्या (रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया) अधिकृत आकडेवारीनुसार नोटाबंदीच्या वर्षात देशातील बँकांमध्ये २३ हजार कोटींहून अधिकचे घोटाळे उघडकीस आले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ‘आरबीआय’कडे विचारणा केली होती. २०१६-१७ या आर्थिक वर्षात बँकांमध्ये किती आर्थिक घोटाळे झाले, याअंतर्गत किती कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली, नोटाबंदीनंतर बँकांमध्ये ५०० व १००० च्या किती नोटा जमा झाल्या इत्यादीसंदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. ‘आरबीआय’कडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत देशातील बँकांमध्ये १ लाख किंवा त्याहून अधिक रकमेचे ५ हजार ७७ घोटाळे उघडकीस आले. यात राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकामध्ये झालेले प्रत्यक्ष घोटाळे किंवा आर्थिक फसवणूक यांचा समावेश होता. या प्रकरणांमध्ये २३ हजार ९३३ कोटी ९१ लाख रुपयांच्या रकमेचा समावेश होता. घोटाळे व फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये विविध बँकांनी आतापर्यंत ४८० कर्मचारी-अधिकाऱ्यांना निलंबित केले होते.

Web Title: Rs 23,000 crore scam in banks during the demoneytisation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.