नागपुरात बोनस मिळवण्यासाठी गमावले २४ लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:12 AM2018-05-22T00:12:04+5:302018-05-22T00:12:36+5:30

विमा पॉलिसीवर ‘बोनस’ मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त महिला प्राचार्यांची सायबर गुन्हेगारांनी २४.३८ लाखाने फसवणूक केली. गेल्या सात महिन्यांपासून आरोपी सांगत असलेल्या खात्यात पैसे जमा केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. तरुणक्रांती महापात्रा (६३) रा. रामनगर असे तक्रारकर्त्याचे नाव आहे.

Rs 24 lakh lost in Nagpur for getting bonus | नागपुरात बोनस मिळवण्यासाठी गमावले २४ लाख रुपये

नागपुरात बोनस मिळवण्यासाठी गमावले २४ लाख रुपये

Next
ठळक मुद्देसेवानिवृत्त महिला प्राचार्यांची फसवणूक : सायबर गुन्हेगारांचे कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विमा पॉलिसीवर ‘बोनस’ मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त महिला प्राचार्यांची सायबर गुन्हेगारांनी २४.३८ लाखाने फसवणूक केली. गेल्या सात महिन्यांपासून आरोपी सांगत असलेल्या खात्यात पैसे जमा केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. तरुणक्रांती महापात्रा (६३) रा. रामनगर असे तक्रारकर्त्याचे नाव आहे.
महापात्रा या सेवानिवृत्त प्राचार्य आहेत. पोलीस सूत्रानुसार, महापात्रा यांनी काही दिवसांपूर्वी एचडीएफसी बँकेची विमा पॉलिसी काढली होती. २१ सप्टेंबर २०१७ रोजी त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. एचडीएफसीचा अधिकारी बोलत असल्याचे त्याने सांगितले. त्यांच्या पॉलिसीवर अतिरिक्त बोनस देण्याचे त्याने आमिष दाखविले. त्याने महापात्रा यांना सांगितले की, २८ हजार रुपये जमा केल्यावर त्यांना दीड लाख रुपयाचा अतिरिक्त बोनस मिळेल. केवळ दोन महिन्यांपूर्वी काढण्यात आलेल्या पॉलिसीवर दीड लाख रुपये बोनस मिळणार असल्याच्या आमिषात त्या आल्या. त्यामुळे त्यांनी आरोपीने सांगितल्यानुसार पैसे जमा केले. त्यानंतर महापात्रा यांना वेगवेगळ्या नंबरवरून महिला-पुरुष फोन करून त्यांना आपल्या जाळ्यात ओढत राहिले. बोनसचे आमिष दाखवीत वेगवेगळ्या खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. महापात्रा यांनीही ते सांगत त्या खात्यात पैसे जमा करीत राहिल्या. यासाठी त्यांनी दोनवेळा कर्जही घेतले. एप्रिल महिन्यात त्यांनी आणखी पैसे जमा करण्यास असमर्थता दर्शविली. यानंतर त्यांनी सांगितले की, त्यांना गुन्हे शाखा पोलिसांनी पकडले असून इतके मोठी रक्कम कुठून आली, याबाबत ते विचारत आहेत तसेच कारवाईची धमकीही देत आहेत. तुमचे नाव सांगितले तर ते तुम्हालाही विचारपूस करण्यासाठी बोलावतील. तुमचे वय पाहता आम्ही तुमचे नाव सांगितले नाही, असे म्हणत गुन्हे शाखेचे पोलीस पाच लाख रुपये मागत आहेत. त्यांच्याकडे साडेतीन लाख रुपये आहेत. दीड लाख रुपये तुम्ही द्या, असे आरोपीने सांगितले. ही रक्कम जमा केल्यानंतर महापात्रा यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
महापात्रा यांची मुले विदेशात राहतात. त्यांची मुलगी अमेरिकेतून आल्यानंतर त्यांनी तिला आपबिती सांगितली. मुलीने सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास सायबर सेलचे निरीक्षक पिंदूरकर आणि विजय खरे करीत आहेत.

Web Title: Rs 24 lakh lost in Nagpur for getting bonus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.